IIFA Awards 2025: बहुचर्चित ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळा नुकताच पार पडला. यंदा हा पुरस्कार सोहळा भारतातच आयोजित करण्यात आला होता. जयपूरमध्ये मोठ्या दिमाखात ‘आयफा पुरस्कार’ सोहळा झाला. ८ मार्चला ‘आयफा डिजिटल पुरस्कार २०२५’ सोहळा झाल्यानंतर ९ मार्चला ‘आयफा पुरस्कार २०२५’ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली होती. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करीना कपूर, शाहिद कपूर यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘आयफा पुरस्कार २०२५’ सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामधील कार्तिक आर्यन व क्रिती सेनॉनच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘आयफा डिजिटल पुरस्कार २०२५’मध्ये क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘दो पत्ती’ चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तसंच ‘आयफा पुरस्कार २०२५’मध्ये क्रार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यामुळे सध्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. पण कार्तिक, क्रितीच्या एका व्हिडीओची सध्या खूप चर्चा सुरू आहे.
‘फिल्मी मंत्रा’ने कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रिती सेनॉन मंचावर येताच कार्तिक हात जोडून तिला नमस्कार करताना दिसत आहे. पण क्रिती त्याला दुर्लक्ष करते. बाजूला उभे असलेल्या पाहुण्यांना नमस्कार करते. तसंच कार्तिकच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या करीना कपूरला जाऊन मिठी मारते. माधुरी दीक्षितबरोबर बोलते. पण ती कार्तिककडे बघतदेखील नाही. त्याचीशी बोलत नाही. त्यामुळेच सध्या क्रितीला नेटकरी ट्रोल करत आहेत.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “फ्लॉप क्रिती स्टार कार्तिकवर जलस आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तो सतत तिच्याकडे बघतोय. पण ती साधं त्याच्याकडे बघतं सुद्धा नाही. खूप वाईट वाटतंय.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आजपासून क्रिती सेनॉन बायकॉट. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “क्रितीकडे अनावश्यक खूपच अहंकार आहे.”

दरम्यान, कार्तिक आर्यनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘आशिकी ३’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग बसू सांभाळणार आहे. ‘आशिकी ३’ चित्रपटात कार्तिकबरोबर तृप्ती डिमरी झळकणार होती. पण तिचा पत्ता कट करण्यात आला. तृप्तीच्या जागी श्रीलीला पाहायला मिळणार आहे.