‘बर्फी’ फेम अभिनेत्री इलियाना डिक्रुझने ती गर्भवती असल्याचं जाहीर केलंय. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने सर्वांना ती लवकरच आई होणार असल्याची माहिती दिली. इलियाना डिक्रुझचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे त्या बाळाचे वडील कोण किंवा तिचा बॉयफ्रेंड कोण आहे? याबद्दल नेकटरी प्रश्न विचारत आहेत. अशातच इलियाना कतरिना कैफच्या भावाला डेट करत होती, त्यामुळे बाळाचा पिता तोच असावा, असंही म्हटलं जातंय.
लग्न न करताच इलियाना डिक्रूज होणार आई, गरोदरपणाची घोषणा करत म्हणाली…
गेल्या वर्षी इलियानाचा कतरिना कैफ व तिच्या कुटुंबाबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासून ती कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘कॉफी विथ करण सीझन ७’मध्ये करणने याबद्दल वक्तव्य केलं होतं, पण इलियानाने जाहीरपणे नात्याची कबुली दिली नाही, तसेच त्याच्याशी लग्नही केलेलं नाही. त्यामुळे इलियानाचा पार्टनर कोण आहे, याबद्दल नेटकऱ्यांना प्रश्न पडू लागले आहेत.
दरम्यान, सेबॅस्टियन आणि इलियाना जवळपास एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत, असं म्हटलं जातंय. नवभारत टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दोघे अनेकदा कतरिनाच्या वांद्रे येथील जुन्या घरात एकत्र दिसले. सेबॅस्टियन आणि इलियाना इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात.
दरम्यान, गेल्या वर्षी जुलै महिन्यात इलियाना कतरिनाच्या जवळच्या मित्रांसोबत दिसली. सर्वजण कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले होते. इलियानाने स्वत: कॅटरिना, विकी कौशल, सेबॅस्टियन, इसाबेल, आनंद तिवारी आणि मिनी माथूर यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला होता.
कतरिनाच्या भावाला डेट करण्यापूर्वी इलियाना डिक्रूझ ऑस्ट्रेलियाचा फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. काही कारणाने त्यांचं ब्रेकअप झालं होतं.