मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत इलियाना डिक्रूझ हिचेही नाव सामील आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या इलियानाचा आज वाढदिवस. १९८७ साली तिचा जन्म मुंबईत झाला. इलियानाने लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर तिने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा : दिशा पटानीची एक्स बॉयफ्रेंडच्या बहिणीबरोबर लंच डेट, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले, “तुझं पुन्हा…”
‘देवासु’ हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी तिला दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतील सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यानंतर तिने ‘पोकरी’, ‘किक’, ‘जुलै’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत यश मिळाल्यानंतर ती बॉलिवूडकडे वळली. तिचा पहिलाच हिंदी चित्रपट ‘बर्फी’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर ती ‘मैं तेरा हीरो’, ‘रेड’, ‘रुस्तोम’ आणि ‘बादशाहो’ या चित्रपटात दिसली. तसेच तिने अभिषेक बच्चनसोबत ‘द बिग बुल’ या चित्रपटामध्येही काम केले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.
हेही वाचा : ‘एकच बिकिनी आहे का?’ व्हेकेशन फोटोंमुळे इलियाना डिक्रुझ झाली ट्रोल
इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. काही वर्षांपूर्वी तिने स्वतः तिच्या एका सवयीबद्दल मोठा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की तिला झोपेत चालण्याची सवय आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ती रात्री झोपेत चालते ते तिने मान्य केले आहे आणि ती जर झोपेत चालली नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पायला सुज आणि फोड येतात. तिच्या या आश्चर्यकारक खुलाशावर चाहतेही थक्क झाले होते. त्यावेळी त्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या.