अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या या गोष्टीमुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची बातमी चाहत्यांनी शेअर केली होती. तिने ही पोस्ट शेअर करताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण, असा प्रश्न अनेकांनी तिला कमेंट करत विचारला. तर तिने तिच्या गरोदरपणाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

इलियानाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, ती तिची प्रेग्नेंसी कशी एन्जॉय करत आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. इलियानाही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या गरोदरपणाबद्दल नवनवीन गोष्टी ती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करते. आता गरोदरपणात वाढणाऱ्या वजनाबद्दल तिने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर इलियाना डिक्रूजने पहिल्यांदाच शेअर केला बॉयफ्रेण्डबरोबरचा फोटो, म्हणाली…

इलियानाने नुकतंच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. ह्यात एका चाहत्याने तिला विचारलं, “तुलाही वाढत्या वजनाचा त्रास जाणवत आहे का?” त्यावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये वाढणाऱ्या वजनावरून ती त्रासली होती पण आता तिला काहीही फरक पडत नाही, असं ती म्हणाली. तिने लिहिलं, “जेव्हा तुम्ही बाळाला जन्म देणार असता तेव्हा अनेकजण तुमच्या वजनाबद्दल बोलतात. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातात तेव्हाही तुम्हाला याबाबतीत कोणतीही मदत मिळत नाही आणि सारखं वजन तपासावं लागतं. वाढत्या वजनाबद्दल सतत डोक्यात विचार येतो.”

हेही वाचा : “हा तर रणबीर कपूर…,” गरोदर इलियाना डिक्रूजने शेअर केला बॉयफ्रेंडबरोबरचा खास फोटो, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

पुढे ती म्हणाली, “पण गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या शरीराचे बदल झाले आहेत ते पाहून मी खूप खुश आहे. एक अद्भुत गोष्ट आहे. हा सगळा प्रवास खूप सुंदर आहे. मी ही एक माणूस आहे कधीकधी मलाही थकायला होतं. पण मला प्रेम देणारी आणि मी एक जीव पोटात वाढवत आहे हे मला प्रेमाने सांगणारी अनेक जवळची माणसं माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मला वाढत्या वजनाचा मला काही फरक पडत नाही.”

Story img Loader