बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने ऑगस्टमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने यावर्षी १८ एप्रिलला गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यानंतर बेबी बंप दाखवत तिने अनेक फोटो शेअर केले होते. परंतु, तिच्या बाळाचे वडील कोण आहेत किंवा बाळाचं संगोपन ती एकटी करते का? याबाबत तिने कधीच अधिकृतपणे भाष्य केलेलं नव्हतं. अभिनेत्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. या सेशनमध्ये इलियानाने पहिल्यांदाच गरोदरपणाचा अनुभव, बाळाचं संगोपन ती कसं करते याबद्दल मोकळेपणाने तिच्या चाहत्यांशी संवाद साधला.

इलियानाच्या एका चाहत्याने तिला गर्भधारणेविषयी समजल्यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? तुझ्या मनात काय भावना होत्या? याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “साधारण एक वर्षापूर्वी मला मी गरोदर असल्याचं समजलं. माझ्यासाठी तो खूप जास्त आनंददायी आणि त्याचबरोबर आयुष्यातील एक भावुक क्षण होता. आजही माझ्या बाळाचा हात धरल्यावर माझ्या मनात एक वेगळीच भावना असते. हे सगळं खरंच स्वप्नवत आहे.”

हेही वाचा : मराठी सिनेमांना कमी स्क्रीन्स का मिळतात? ‘झिम्मा २’चा दिग्दर्शक स्पष्ट मत मांडत म्हणाला, “आपली स्पर्धा थेट…”

इलियानाच्या दुसऱ्या एका चाहत्याने तिला विचारलं, “तू तुझ्या बाळाचं संगोपन एकटी करतेस का?” यावर अभिनेत्रीने बॉयफ्रेंड मायकलबरोबरचा फोटो शेअर करत “नाही…” असं उत्तर दिला. अर्थात आम्ही दोघं मिळून बाळाची काळजी घेतो असं तिला सूचित करायचं होतं.

हेही वाचा : “लग्नाला ६० दिवस बाकी…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरच्या पोस्टने वेधलं लक्ष; चाहते म्हणाले, “पत्रिका…”

Ileana dcruz
इलियाना

दरम्यान, अभिनेत्री इलियाना डिक्रुझने तिच्या बाळाचं नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असं ठेवलं आहे. तिने १ ऑगस्ट २०२३ रोजी बाळाला जन्म दिला होता. यानंतर कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता.

Story img Loader