बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खानची पत्नी अवंतिका मलिक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अवंतिका आणि इमरान यांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं. पण मागच्या काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. अशातच आता अवंतिका पुन्हा एकदा प्रेमात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अवंतिकाने शेअर केलेल्या काही फोटोंनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवंतिका मलिक सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इमरान खानपासून विभक्त झाल्यानंतर तिने अनेकदा आपल्या पोस्टमधून आपलं दुःख व्यक्त केलं होतं. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरलही झाल्या होत्या. पण आता एका मिस्ट्री मॅनबरोबर फोटो शेअर केल्यानंतर ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अवंतिका पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा- इम्रान-अवंतिका नात्याला देणार पुन्हा संधी; घेतला एकत्र येण्याचा निर्णय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार अवंतिका इमरान खानपासून वेगळी राहते. शुक्रावारी तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या कुटुंबियांबरोबर दिसत आहे. तर काही फोटोमध्ये अवंतिका एका मिस्ट्रीमॅनबरोबर दिसत आहे. तिच्याबरोबर फोटोमध्ये दिसलेल्या या व्यक्तीचं नाव साहिब सिंह लांबा असं असल्याचं समोर आलं आहे. अवंतिकाने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये #decemberdump असा हॅशटॅग वापरला आहे. तिचे हे फोटो ख्रिसमस सेलिब्रेशन आणि न्यू इयर सेलिब्रेशनचे असल्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा- ‘या’ अभिनेत्रीमुळे इमरान आणि अवंतिकाच्या नात्यात पडली फूट?

दरम्यान इमरान खान आणि अवंतिका मलिक यांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं २०१४ मध्ये अवंतिकाने मुलीला जन्म दिला. पण २०१९ मध्ये मात्र दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि ते वेगवेगळे राहू लागले. मीडिया रिपोर्टनुसार अवंतिका आणि इमरान आता एकत्र राहत नाहीत. मात्र दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज दिलेला नाही असंही बोललं जातं.