आमिर खानचा भाचा व अभिनेता इम्रान खान मागच्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. चित्रपटापासून दूर झालेल्या इम्रानचं आयुष्य फार बदललं आहे. आता तो सिनेसृष्टीत परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ‘जाने तू या जानेना’च्या सीक्वेलद्वारे तो कमबॅक करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच एका मुलाखतीत इम्रान खानने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याने सांगितलं की त्याला त्याची संपूर्ण जीवनशैली बदलावी लागली. तसेचं त्याला महागडी गाडी विकावी लागली आणि बंगलाही सोडावा लागला. ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान म्हणाला, “२०१६ पासून माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. मी आयुष्याच्या अशा टप्प्यातून गेलो होतो जिथे मी सगळचं हरवून बसलो होतो. चांगली गोष्ट अशी होती की तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो आणि मला चांगले पैसे मिळत होते. मी जोपर्यंत ३० वर्षांचा होतो तोपर्यंत मला कसलीच चिंता नव्हती. मी माझ्या कामाप्रती तेवढा उत्साही नव्हतो म्हणून माझ्या करिअरसाठी फारशी मेहनतही घेतली नव्हती. मी एका मुलीचा बाबा झालो होतो आणि आता आयुष्यात मला एवढंच हवं आहे असं वाटत होतं. मला बाबा म्हणून जगायचं होतं आणि माझ्या मुलीसाठी बेस्ट व्हर्जन व्हायचं होतं. अभिनय करणं हे माझं काम नाही असं मी ठरवलं. मला माझ्या मुलीसाठी फिट व्हायचं होतं.

हेही वाचा… VIDEO: आधी बाईकवरून पाठलाग, नंतर शिवीगाळ करत…; प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

इम्रान पुढे म्हणाला, “आता माझं आयुष्य फार बदललं आहे. मी फरारी विकून फॉक्सवॅगन गाडी घेतली आहे. मी पालीमधल्या माझ्या आलीशान बंगल्यातून बाहेर आलो आहे आणि आता बांद्रामध्ये एका अपार्टमेंट मध्ये राहतो. इथे खूप सामान्य आयुष्य जगतो. माझ्याकडे फक्त ३ प्लेट्स, तीन चमचे, दोन कॉफी मग आणि एक फ्राइंग पॅन आहे. “

“मी २०१६ पासून माझे केस स्वत:च कापतो. १० वर्षांपासून माझ्याकडे चष्म्याची फक्त एक फ्रेम आहे. आयरा खानच्या लग्नात माझा १० वर्षे जुना सूट मी घातला होता,” असंही इम्रानने सांगितलं.

हेही वाचा… “मला शाहरुख सरांचा फोन आला अन् त्यांनी…”, भूमी पेडणेकरने सांगितला किस्सा; म्हणाली…

दरम्यान, इम्रान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने अवंतिकाशी २०११ मध्ये लग्न केलं आणि २०१४ मध्ये त्यांनी मुलगी इमाराचं स्वागत केलं. अवंतिका व इम्रान एकत्र राहत नाहीत, ते विभक्त झालेत, असं म्हटलं जातंय. पण त्यांनी अधिकृतपणे याबाबत माहिती दिलेली नाही. तो सध्या लेखा वॉशिंग्टनला डेट करतोय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khan sold a car and bungalow he shared his life experience after quitting the film industry dvr