Imran Khan Kidnap Movie : बॉलीवूड अभिनेता इमरान खान बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. काही वर्षे तर तो सोशल मीडियावरही नव्हता. मागच्या काही काळापासून तो सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. तो सोशल मीडिया व मुलाखतीतून व्यक्त होतोय. आता त्याने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा त्रासदायक अनुभव सांगितला आहे. या शूटिंगवेळी त्याची सह-कलाकार जखमी झाली होती, हे पाहून इमरानला खूप त्रास झाला होता.
‘वी आर युवा’ या युट्यूब चॅनलला इमरान खानने मुलाखत दिली. यामध्ये त्याने फिल्म इंडस्ट्रीतील त्याचे अनुभव, मानसिक आरोग्य, त्यामुळे झालेला त्रास व त्यातून तो व्यक्ती म्हणून कसा बदलला याबाबत माहिती दिली. असा कोणता चित्रपट आहे का, जो केल्याचा पश्चाताप आहे असं इमरानला विचारण्यात आलं. त्यावर त्याने २००८ मध्ये आलेल्या ‘किडनॅप’ सिनेमाचं नाव घेतलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी गेलं होतं. यात इमरान खान, मिनिषा लांबा (Minissha Lamba) व संजय दत्त यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. इम्रानचा पहिला चित्रपट ‘जाने तू या जाने ना’ यानंतर ‘किडनॅप’ प्रदर्शित झाला होता.
नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी केला साखरपुडा, नागार्जुन यांनी फोटो केले शेअर
तो म्हणाला, “किडनॅप सिनेमातील एक भाग शूट करताना मला खूप अस्वस्थ वाटलं होतं. त्यात ‘मौसम’ नावाचं रोमँटिक गाणं आहे आणि त्यानंतर लैंगिक हिंसेचा सीन आहे. जिथे माझे पात्र मिनिषा लांबाला गुहेत खेचतं आणि क्षणभर असं वाटते की तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार आहे. किंबहुना तो सीन तसाच सुरू होतो आणि मग तो थांबतो. मला वाटत नाही की तो सीन गरजेचा होता आणि मला तो शूट करणं खूप कठीण वाटलं होतं.”
मला खूपच अस्वस्थ वाटत होतं – इमरान खान
इम्रान पुढे म्हणाला, “मी त्या सीक्वेन्सच्या शूटिंगमध्ये दिवस घालवला आणि संध्याकाळी घरी गेलो. मला खूपच अस्वस्थ वाटत होतं. मला झोप येत नव्हती, मला उलट्या झाल्या. मी तो सीन माझ्या डोक्यातून काढू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मिनिषाकडे गेलो आणि पाहिलं की जिथे मी तिला पकडलं होतं त्याच हातावर जखमा होत्या, ते पाहून मी विचार केला, ‘देवा, हे मी काय केलं?’ त्यानंतर मी तिच्याबरोबर बसलो आणि बोलायचं असल्याचं सांगितलं. कारण जे घडलं त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. पण ती मात्र निवांत होती. तिच्यामुळे मी त्यावेळी शांत होऊ शकलो. पण नंतर मात्र मला हा सीन कायम डोक्यात राहिला.”