करीना कपूर-खान आणि शाहिद कपूर यांचा २००७ साली प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. अजूनही प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटासाठी एक खास जागा आहे. चाहत्यांनी अनेकदा चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची बातमी समोर आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video: “मला भीती वाटत आहे…,” श्रद्धा कपूरने मराठी बोलत व्यक्त केली काळजी, अभिनेत्रीच्या साधेपणाने वेधलं लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार ‘जब वी मेट’च्या सिक्वेलवर लवकरच काम सुरू होणार आहे. पहिला भाग दिग्दर्शित करणारे इम्तियाज अलीच या दुसऱ्या भागाचेही दिग्दर्शन करणार आहेत. ‘जब वी मेट २’साठी शाहिद कपूर व करीना कपूर यांनी होकार दिला असल्याचे सांगण्यात आले होते. या चर्चांवर आता इम्तियाज अली यांनी मौन सोडत चित्रपटाच्या सिक्वेलबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा- “कोणाबरोबरही झोपायला जबरदस्ती…”, नीना गुप्ता यांनी कास्टिंग काउचबद्दल केलेले विधान

नुकत्याच एका मुलाखतीत इम्तियाज अली यांनी ‘जब वी मेट’च्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. इम्तियाज अली म्हणाले, “माझ्याकडे आतापर्यंत ‘जब वी मेट २’बाबत कोणतीही कथा आलेली नाही. मी या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अनेक बातम्या वाचल्या आहेत. या बातम्या छापण्याअगोदर कुणी मला विचारलेही नाही. याबाबत मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये.”

हेही वाचा- हृतिक रोशनला डेट केल्यानंतर सबा आझादला करावा लागलेला तिरस्काराचा सामना; अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली, “अनेकदा मनात विचार येतो…”

याच वर्षी ‘जब वी मेट’ काही चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात शाहिद कपूरने साकारलेले ‘आदित्य’ आणि करीना कपूरने साकारलेले ‘गीत’ ही पात्रे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात शाहिद व करीनाच्या या ‘जब वी मेट’ची जागा कोणताही चित्रपट घेऊ शकलेला नाही. त्यामुळे याच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiaz ali breaks silence on shahid kareena kapoor jab we met sequel rumours dpj
Show comments