Aaliya Bhatta : सिनेविश्वात एखादा चित्रपट बनवताना त्यामागे बरीच मेहनत घेतली जाते. दिग्दर्शक आणि निर्मात्यांना चित्रपटातील एखादे पात्र उत्तमरीत्या साकारलं जावं यासाठी त्यांना हवा तसा कलाकार शोधताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी बऱ्याच ऑडिशन घेतल्या जातात आणि त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या कामाचं कसब दाखवावं लागतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टचा ‘हायवे’ चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. या चित्रपटात आलियाने दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इम्तियाज अली यांची या चित्रपटासाठी पहिली पसंती आलिया नाही, तर ऐश्वर्य बच्चनला होती. ‘हायवे’साठी मुख्य भूमिकेत आलिया नाही, तर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला दिग्दर्शकांनी पहिली पसंती दिली होती. पण मग, आलियाची निवड कशी झाली याची माहिती जाणून घेऊ.

हेही वाचा : Bigg Boss 18: ‘हा’ सदस्य पुन्हा झाला टाइम गॉड’, करणवीर मेहराच्या एका चुकीमुळे दिग्विजय राठीची संधी हुकली, नेमकं काय घडलं? वाचा…

‘मिड-डे’ने दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अली यांनी एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता. चित्रपटातील वीरा त्रिपाठी हे पात्र साकारण्यासाठी त्यांना एक मध्यमवयीन अभिनेत्री हवी होती. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी जी सहजपणे करू शकेल अशी त्यांना अपेक्षित वयातील अभिनेत्रीच्या शोधात ते असताना त्यांच्या डोक्यात ऐश्वर्या राय-बच्चन होती.

मुलाखातीमध्ये इम्तियाज अली यांनी सांगितलं, “मी या पात्रासाठी वयाने थोडी मोठी असलेली अभिनेत्री शोधत होतो. मला कमीत कमी ३० वर्षे वय असलेली महिला या पात्रासाठी हवी होती. त्यामुळे या पात्रासाठी चेहऱ्यावर कोणताही मेकअप न करता, ऐश्वर्या राय-बच्चन एक उत्तम पर्याय होती.”

‘हायवे’ आलियाला कसा मिळाला?

इम्तियाज अली हे आलिया भट्टला ‘लव शव ते चिकन खुराना’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी भेटले होते. त्यावेळी त्यांनी आलियाबरोबर वार्तालाप केला आणि त्यांनी पुढे आलियाची का निवड केली याची माहिती दिली आहे. इम्तियाज अली म्हणाले, “माझी भावनात्मक स्थिती उत्तम होती आणि अचानक मला आलियाशी संवाद साधण्याची इच्छा झाली. त्यानंतर मी तिला स्क्रिप्ट दिली आणि चित्रपटाची कथा तुझ्या भाषेत सांग, असं सांगितलं. आलियानं सांगितलेली स्टोरी ऐकल्यानंतर तीच हे पात्र फार छान पद्धतीनं साकारू शकेल, असं आम्हाला वाटलं.” आलियाला मुख्य भूमिका देण्याचा विचार सुरू असताना संपूर्ण युनिटला आलिया हे करू शकणार नाही, असं वाटत होतं. मात्र, तिनं तिच्या पद्धतीनं या चित्रपटाची कथा सांगितल्यावर सर्वांचा विचार बदलला आणि आलियाला ‘हायवे’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

हेही वाचा : मराठी सिनेमे हिंदीत डब का होत नाहीत? नाना पाटेकरांचा सवाल; प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’बद्दल म्हणाले…

‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा आलियाचा पहिलाच चित्रपट होता. सिनेविश्वात या चित्रपटातून तिनं पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर तिनं लगेचच ‘हायवे’मध्ये दमदार भूमिका साकारली. सिनेविश्वात सुरुवातीलाच साकारलेल्या आलियानं ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं. लवकरच आलिया ‘अल्फा’, ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiaz ali first choice for highway is aishwarya rai bachchan alia bhatt is second rsj