बॉलिवूडमध्ये सतत काहीतरी वेगळे आणि हटके विषय असलेले चित्रपट देणारा दिग्दर्शक इम्तियाज अलीने आज या इंडस्ट्रीत स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. ‘लव्ह आज कल’, ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’सारख्या चित्रपटातून इम्तियाज हा एक संवेदनशील फिल्ममेकर म्हणून समोर आला. त्याचे चित्रपट तरुण पिढीला थिएटरकडे खेचून आणण्यात यशस्वी व्हायचे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इम्तियाजचा ‘रॉकस्टार’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या पिढीला त्यांचा खरा रॉकस्टार गवसला. या चित्रपटाने रणबीरच्या करिअरला एक वेगळं वळण दिलं. इम्तियाज अली, रणबीर कपूर आणि एआर रेहमान हे समीकरण अचूक जुळून आलं होतं. नुकतंच ‘रोशन अब्बास पॉडकास्ट’मध्ये इम्तियाजने या चित्रपटाविषयीच्या काही आठवणी सांगितल्या.
आणखी वाचा : “आपल्याकडे लोक म्हातारे होतात पण…” दिग्दर्शक महेश भट्ट यांचं विधान चर्चेत
या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी आधी इम्तियाज जॉन अब्राहमला घेणार होता. ‘जब वी मेट’च्याही आधीच इम्तियाजने या चित्रपटावर काम सुरू केलं होतं. इतकंच नव्हे तर यासाठी रेहमान यांनी संगीतावरही काम सुरू केलं होतं. रेहमान यांना जेव्हा इम्तियाजने रॉकस्टारबद्दल सांगितलं तेव्हापासूनच ते या चित्रपटाशी जोडले गेले होते. त्यानंतर तब्बल ५ वर्षं अशीच गेली. परंतु ‘रॉकस्टार’च्या सुरुवातीच्या कामासाठी रेहमान यांनी इम्तियाजकडून एकही रुपया घेतला नाही.
त्यानंतर मध्यंतरी इम्तियाजने ‘जब वी मेट’ व ‘लव्ह आज कलसाठी रेहमान यांना संगीत देण्यासाठी विचारलं पण तेव्हासुद्धा रेहमान यांनी ‘रॉकस्टार’विषयीच इम्तियाजकडे विचारणा केली. रेहमान यांच्याबरोबर काम सुरू केल्यावर तब्बल ५ वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये ‘रॉकस्टार’ प्रदर्शित झाला.
याविषयी बोलताना इम्तियाज म्हणाला, “त्यावेळी युटीव्हि आणि रेहमान हे एकत्र ‘रंग दे बसंती’साठी काम करत होते. त्यांनी मला रेहमान यांना भेटायला सांगितलं.” इम्तियाज जेव्हा रेहमान यांना भेटला आणि ‘रॉकस्टार’ची कहाणी ऐकवायला सुरुवात केली अन् ती गोष्ट ऐकवताना मध्येच इम्तियाजने प्रेमावरची एक कविता रेहमान यांना ऐकवली अन् त्यावेळी इम्तियाजच्या डोक्यात हे नक्की झालं की ‘रॉकस्टार’साठी रेहमानच संगीत देणार.
पुढे इम्तियाज म्हणाला, “त्यानंतर त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही सेशन्सचे त्यांनी मानधन घेतले नाही. मोठी माणसं कधीच पैशाची भाषा करत नाहीत. मी ज्यांना मानतो त्यापैकी कदाचितच अशी व्यक्ती असेल जी पैशाबद्दल बोलेल. ही गोष्ट मी रेहमान यांच्याकडून शिकलो.”