भारतातील एका चित्रपटाने चीनमध्ये कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त १५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या बॉलीवूड चित्रपटाने भारतापेक्षा जास्त कमाई चीनमध्ये केली होती. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री त्यावेळी फक्त १६ वर्षांची होती. या अभिनेत्रीच्या फक्त चित्रपटांनी ३००० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.

कोणता आहे हा चित्रपट

अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात झायरा वसीमची मुख्य भूमिका होती. ‘दंगल’नंतर हा तिचा मोठा चित्रपट होता. ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये निर्माता आमिर खानसह राज अर्जुन, मेहर विज आणि तीर्थ शर्मा यांच्याही भूमिका होत्या. (Secret Superstar Budget) फक्त १५ कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने (Secret Superstar Collection) ६४ कोटी रुपये कमाई केली होती.

sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Kolkata’s chess star Anish Sarkar impresses Anand Mahindra
कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
Loksatta chip charitra Semiconductor industry chip Chinese oppression Xi Jinping
चिप-चरित्र: चिनी दबावतंत्राची निष्पत्ती!
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 1
Bhool Bhulaiyaa 3 ठरला कार्तिक आर्यनचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट, पहिल्या दिवशी कमावले तब्बल…

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

‘सिक्रेट सुपरस्टार’ची चीनमधील कमाई

चित्रपटाने भारतापेक्षा जास्त चीनमध्ये कमाई केली होती. चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा तो भारतीय चित्रपट ठरला. ‘सिक्रेट सुपरस्टार’ने चीनमध्ये तब्बल ७५० कोटी रुपये कमावले होते. ६५ कोटी हाँगकाँगमधून कमावले. या महिलाकेंद्रीत चित्रपटाने जगभरात तब्बल ९०५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

हेही वाचा – ५३व्या मजल्यावरील आलिशान घरात राहते माधुरी दीक्षित, पाहा तिच्या मुंबईतील घरातील Inside Photos

झायरा वसीमचे करिअर

झायरा वसीमने तिच्या करिअरमध्ये ‘दंगल’ व ‘सिक्रेट सुपरस्टार’ दोन दमदार चित्रपट केले. या दोन्ही चित्रपटांनी एकूण ३००० कोटी रुपयांची कमाई केली. तिचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. तिला तिच्या या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

झायराने वसीमने यानंतर आणखी फक्त एकच चित्रपट केला आणि तो रिलीज होण्याआधीच सिनेइंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी झायराने इस्लामसाठी बॉलीवूड सोडले. तिचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा ‘द स्काय इज पिंक’ होता. मात्र, ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दिसली नव्हती. आता ती सिनेइंडस्ट्रीपासून दूर आयुष्य जगत आहे. ती विविध विषयांवर तिची मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते.