ऐतिहासिक चित्रपट, रिमेक आणि चरित्रपट हे सध्या बॉक्स ऑफिसवर हमखास यश मिळवून देणारे ठरत आहेत. बायोपिक सध्या फारसे बनत नसले तरी अधून मधून एखादा बायोपिक आपल्याला पाहायला मिळतो. कंगनाच्या ‘एमर्जन्सि’ या इंदिरा गांधी यांच्यावर बेतलेल्या बायोपिकची सध्या चांगलीच चर्चा आहे. इतरही काही विषयांवर काम सुरू आहे. मध्यंतरी अभिनेत्री मधुबालावरील बायोपिकची चर्चासुद्धा चांगलीच रंगली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौंदर्याबरोबरच मधूबाला यांच्या आयुष्यातील घडामोडींचं आणि त्यामागील कारणांचं कुतूहल प्रत्येकाला आहे. मधुबाला यांच्यावर बेतलेला बायोपिक बघायला प्रत्येकालाच आवडेल, पण तो बायोपिक इतर कुणी करू नये अशी इच्छा मधूबाला यांच्या बहिणीने व्यक्त केली आहे. ‘पिंकव्हीला’शी संवाद साधताना दिवंगत अभिनेत्री मधूबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण यांनी मधूबालाच्या बायोपिकविषयी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “आपत्तीजनक दृश्यं हटवा, नाहीतर..” मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिली ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाला ताकीद

मधुर ब्रीज भूषण म्हणाल्या, “एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की मधूबालावर एकच बायोपिक बनेल ज्यामध्ये माझा सहभाग असेल. मला कुणाला दुखवायचा हेतु नाही, पण मधूबालाविषयी माहिती नसलेल्या गोष्टी आम्हाला लोकांसमोर आणायला आवडेल. हा बायोपिक बनवण्यासाठी मी पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. मी आणि माझी टीम यावर काम करत आहोत, लवकरच याबद्दल अधिकृती घोषणाही करू. आम्ही सध्या यासाठी बरीच मेहनत घेत आहोत.”

इतर कुणीही या बायोपिकच्या फंदात पडू नये अशी भूषण यांनी हात जोडून नम्र विनंतीही केली आहे. पुढे त्या म्हणाल्या, “ज्यांना हा बायोपिक करायची इच्छा आहे त्यांनी आमच्या कुटुंबाच्या खासगी गोष्टींचं भान ठेवायला हवं. हा बायोपिक बनवण्यासाठी मी माझ्याकडून शक्य होईल तितकी मदत करायला तयार आहे.” मधुबाला यांच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या, लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बनणारा हा बायोपिक आणखीन उत्तम आणि वास्तवदर्शी कसा होईल ते केवळ त्यांची बहीणच सांगू शकेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian actress madhubala sister request other filmmaker to stay away from her biopic subject avn