बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये अनेक कलाकार आणि खेळाडू यांचाही समावेश आहे. तोही त्याच्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. प्रत्येकाला तो आपलेपणाने भेटतो. नुकतीच भारताची प्रसिद्ध महिला बॉक्सर निखत झरीन आणि सलमान खान यांची भेट झाली.

निखत झरीन हिचं बॉक्सिंगवर जितकं प्रेम आहे, तितकंच तिचं सलमानवरही प्रेम आहे. निखत झरीनची गेली अनेक वर्ष सलमानला भेटण्याची इच्छा होती. तिने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये ती इच्छा बोलूनही दाखवली आहे. आता अखेर निखतचं सलमानला भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. नुकतीच तिने सलमान खानची भेट घेतली आहे.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bollywood actor sahil khan announces secon wife conversion to islam
बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”

आणखी वाचा : पंतप्रधान मोदींनी गायिका पलक मुच्छाल-मिथुन शर्माला पाठवलं पत्र; लग्नाच्या शुभेच्छा देत म्हणाले…

सलमान आणि निखत यांची भेट निखतसाठी अविस्मरणीय ठरली. भेटल्यावर फक्त गप्पाच नाही तर तिने त्याच्यासोबत सहजसुंदर एका चित्रपटातील गाण्यावर डान्सही केला आहे. निखत झरीनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सलमान खानच्या भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. निखत जरीन सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये निखत झरीन सलमान खानसोबत त्याच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा : ‘दबंग ४’ बनवण्यासाठी सलमान खान आणि अरबाज उत्सुक पण ‘ही’ आहे मोठी अडचण, दिग्दर्शकाचा खुलासा

या व्हिडिओमध्ये सलमान खान पांढरा शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसत आहे. तर निखत जरीन निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही ‘साथिया तुने क्या किया’ गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना निखत जरीनने एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. तिने लिहिलं, “अखेर प्रतीक्षा संपली आहे.” निखत जरीन आणि सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांच्याही चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून ते या व्हिडीओवर कमेंट्स करत भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader