बॉलीवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत एक अभिनेत्री अशी आहे; जी त्यांच्यापेक्षा जास्त मानधन घेते. मॉडेल व अभिनेत्री उर्वशी रौतेला एका मिनिटासाठी चक्क एक कोटी रुपये मानधन आकारते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डीएनए इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेलाने तीन मिनिटांच्या गाण्यासाठी चक्क एक कोटी रुपयांचं मानधन स्वीकारलं होतं. या अभिनेत्रीनं ‘स्कंद’ चित्रपटात ‘कल्ट मामा’ गाण्यावर डान्स केला. या तीन मिनिटांच्या गाण्यासाठी उर्वशीनं चक्क तीन कोटींचं मानधन घेतलं होतं. म्हणजेच एका मिनिटासाठी उर्वशीनं एक कोटी रुपये मानधन घेतलं. त्यामुळे एका मिनिटासाठी एक कोटी मानधन घेणारी ती भारतातली पहिलीच अभिनेत्री ठरली.

हेही वाचा… ‘चला हवा येऊ द्या’ येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला? निलेश साबळे खुलासा करत म्हणाला, “त्या टीममध्ये सागर कारंडे…”

याआधी उर्वशी रौतेलानं चिरंजीवी अभिनीत ‘वॉल्टेअर वीरैया’मधील गाण्यासाठी दोन कोटी रुपये मानधन घेतलं होतं. उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर ७१ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिची एकूण संपत्ती ५५० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. उर्वशी रौतेला ‘फोर्ब्स’च्या टॉप १० मध्ये समाविष्ट होणारी सर्वांत तरुण भारतीयदेखील आहे.

आता ही अभिनेत्री एका ६३ वर्षीय साऊथ सुपरस्टारबरोबर काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. उर्वशी सध्या नंदामुरी बालकृष्णा यांच्यासह तिच्या ‘एन बी के-१०९’ या आगामी चित्रपटाची तयारी करीत आहे. चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्ससाठी तिला एम एम के आयकॉन कोनोर मॅकग्रेगरकडून प्रशिक्षण दिले जात आहे; जो एक प्रसिद्ध आयरिश मार्शल आर्टिस्ट व बॉक्सर आहे.

हेही वाचा… राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये? ‘त्या’ व्हायरल फोटोबद्दल अभिनेता म्हणाला, “मी हनुवटीसाठी…”

एका मुलाखतीत मॅकग्रेगर उर्वशीबद्दल म्हणाला होता, “शाहरुख खाननंतर बॉलीवूडमध्ये मी फक्त उर्वशी रौतेलाला ओळखतो. उर्वशी बॉलीवूडची एक तरुण सुपरस्टार आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असून, तिचा फिटनेस अप्रतिम आहे.”

हेही वाचा… स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”

दरम्यान, उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, उर्वशीनं २०१३ मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिनं २०१४ मध्ये ‘मिस्टर ऐरावता’मधून कन्नड फिल्म इंडस्ट्रीत आणि २०२२ मध्ये ‘द लीजेंड’ चित्रपटातून तमीळ सिनेमात पदार्पण केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias highest paid actress urvashi rautela charges 1 crore for 1 minute dvr