Indias highest paid filmmaker: चित्रपटात काम करण्यासाठी कलाकार किती मानधन घेत असतील, असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांना पडतो. कोणते कलाकार सर्वांत जास्त मानधन घेतात, याचीदेखील चर्चा रंगताना दिसते.
पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचा गर्दीला खेचून आणण्यात मोठा हात असतो. प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकाराला पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करीत असतात. त्यामुळे प्रमुख भूमिका असलेल्या, तसेच लोकप्रिय कलाकारांचे मानधन जास्त असते. आजकाल, अनेकदा यावर चर्चादेखील होताना दिसते. मात्र काही दिग्दर्शक असे आहेत, ज्यांना कलाकारांपेक्षाही जास्त मानधन मिळते. अशा दिग्दर्शकांची लोकप्रियता मोठी असल्याचे पाहायला मिळते. जाणून घेऊ, असे कोणते दिग्दर्शक आहेत, जे कलाकारांपेक्षा जास्त मानधन आकारतात.
शाहरुख खान-सलमान खान यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेणारा दिग्दर्शक कोण?
तेलुगू चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत, ज्यांना सर्वाधिक मानधन दिले जाते. आतापर्यंत सर्वाधिक मानधन आकारणारे एस. एस. राजामौली यांची ओळख आहे. आयएमडीडीनुसार एस. एस. राजामौली हे त्यांचा प्रत्येक चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी २०० कोटी घेतात. जसा चित्रपटाला जास्त फायदा होईल, तसा त्यांचा कमाईतील वाटा वाढत जातो.
त्यांच्या ‘बाहुबली’च्या चित्रपटांना मोठे यश मिळाले होते. त्यामुळे राजामौली यांनी आरआरआर चित्रपटासाठी २०० कोटी मानधन आकारले होते. त्यांच्या या मानधनाच्या रकमेमुळे ते देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक आहेत. शाहरुख खान आणि सलमान खानसारखे सुपरस्टारदेखील प्रत्येक चित्रपटासाठी १५०-१८० कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतात. त्यांचे मानधन राजामौलींच्या कमाईपेक्षा कमी आहे.
राजामौली यांना सुपरस्टार मानले जाते. जेव्हा आरआरआर चित्रपट प्रदर्शित होणार होता. तेव्हा त्या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरणसारखे सुपरस्टार असूनही राजामौलींचा चित्रपट, असे सांगण्यात आले. कारण- त्यांच्या बाहुबली या चित्रपटाने संपूर्ण भारतात मोठे यश मिळवले होते. बाहुबली-२ या चित्रपटाने फक्त हिंदी भाषेत ५१० कोटींची कमाई केली होती. पुढची सहा वर्षे हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. २०२३ मध्ये पठाण या चित्रपटाने बाहुबली-२ ला मागे टाकले. आरआरआर या चित्रपटाने हिंदी भाषेत २७० कोटींची कमाई केली होती.
इंडस्ट्री सोर्सनुसार इतर दिग्दर्शक राजामौली घेतात त्याच्या निमपट मानधनही घेत नाहीत. संदीप वांगा रेड्डी व प्रशांत नील यांच्यासारखे दिग्दर्शक प्रत्येक चित्रपटासाठी ९० कोटी मानधन घेतात. लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे ८० कोटी घेतात. तर सिद्धार्थ आनंद, संजय लीला भन्साळी, सुकुमार हे ४० कोटी घेतात. तर करण जोहर व रोहित शेट्टींसारखे दिग्दर्शक स्वत:चे चित्रपट स्वत: दिग्दर्शित करतात.