भारतीय संगीत विश्वात अनेक गाणी तयार होतात. यापैकी काही गाणी श्रोत्यांच्या लक्षात राहतात, तर काही गाणी फक्त काही दिवस चर्चेत असतात; नंतर मात्र ती कुणाच्याच लक्षात राहत नाहीत. भारतात असे अनेक गायक झाले ज्यांची गाणी, आवाज अजरामर झाले. मात्र, असेही अनेक गायक आहेत, ज्यांना यशाची चव चाखता आली नाही. सध्या भारतात अरिजीत सिंह, श्रेया घोषाल, सोनू निगम हे काही आघाडीचे गायक आहेत. पण भारतात सध्याचा सर्वाधिक मानधन घेणारा गायक कोण आहे? तुम्हाला माहीत आहे का. हा गायक एका गाण्यासाठी तीन कोटी रुपये आकारतो.
भारतात सर्वाधिक मानधन घेणारा गायक
Highest Paid Indian Singer: एआर रेहमान सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे गायक आहेत. ते एका गाण्यासाठी तीन कोटी रुपये मानधन घेतात. भारतातील इतर कोणत्याही गायकापेक्षा हे १२ ते १५ टक्के जास्त मानधन आहे. हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, रहमान एवढं प्रिमिअम मानधन आकारतात. कारण त्यांना त्यांच्या गाण्यांवर काम करायचं असतं; इतरांनी संगीतबद्ध केलेली गाणी ते खूप कमी गातात. ते प्रामुख्याने स्वतःची संगीतबद्ध केलेली गाणी गातात. दुसऱ्या संगीतकारांच्या गाण्यासाठी ते मोठी रक्कम आकारतात.
हेही वाचा – वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता लोकांच्या शेतात अन्न व निवाऱ्यासाठी काम करतोय अभिनेता
जास्त मानधन घेणारे इतर गायक
रेहमान यांच्यानंतर श्रेया घोषाल ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे. ४० वर्षीय श्रेया एका गाण्यासाठी २५ लाख रुपये मानधन घेते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सुनिधी चौहान आहे, ती एका गाण्यासाठी १८ ते २० लाख रुपये घेते. अरिजित सिंहदेखील तेवढंच मानधन घेतो असं म्हटलं जातं. या यादीत पाचव्या क्रमांकावर सोनू निगम आहे. तो एका गाण्यासाठी १५-१८ लाख रुपये घेतो.
हेही वाचा – ४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”
रहमान यांची संपत्ती
AR Rahman Net worth: डीएनएच्या रिपोर्टनुसार, रेहमान हे १७०० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ते एका चित्रपटात गाणी संगीतबद्ध करण्यासाठी आणि गाण्यासाठी १० कोटी रुपये आकारतात. त्याचप्रमाणे एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी ते तासाला ३ ते ५ कोटी आकारतात. ८ कोटींच्या गाड्या, १०० कोटींची इन्व्हेस्टमेंट, ५० हून अधिक कोटींचे आलिशान फ्लॅट, कोट्यवधींचे म्युझिक स्टुडिओ आणि इन्स्टिट्यूट अशी त्यांची संपत्ती आहे.