आजकाल बॉलीवूड सिनेमांमध्ये एक तरी इंटिमेट किंवा किसिंग सीन असतोच. मात्र पूर्वी असं नव्हतं. पूर्वी इंटिमेट सीनवरून वाद व्हायचे. असाच एक ८० च्या दशकातील चित्रपट होता. या चित्रपटात दोन अभिनेत्रींमध्ये जवळीक दाखवण्यात आली होती. त्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र तरीही तो फ्लॉप ठरला होता. या चित्रपटामुळे बॉलीवूडलादेखील आर्थिक फटका बसला होता.

कमाल अमरोही यांनी बनवलेला ‘रझिया सुलतान’ (Razia Sultan) हा चित्रपट १९८३ मध्ये रिलीज झाला होता. त्या काळी या चित्रपटाचं बजेट तब्बल १० कोटी रुपये होतं. हा तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट होता. यामध्ये हेमा मालिनी, धर्मेंद्र, परवीन बाबी, सोहराब मोदी आणि अजित असे दमदार कलाकार होते. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. प्रेक्षकांना चित्रपटात वापरलेली उर्दू भाषा समजली नाही, तर काहींनी हा सिनेमा खूप मोठा असल्याची टीका केली. धर्मेंद्र यांनी ॲबिसिनियन गुलाम योद्धा याकूतची भूमिका करण्यासाठी ब्लॅकफेसचा वापर केल्याची टीकाही झाली होती. १० कोटींचे बजेट असलेल्या ‘रझिया सुलतान’ने फक्त दोन कोटींची कमाई केली होती.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो

हेही वाचा – फक्त दोन कोटींचे बजेट अन् चित्रपटाने ४२ वर्षांपूर्वी कमावले होते १०० कोटी, तुम्ही पाहिलाय का हा बॉलीवूड सिनेमा?

‘रझिया सुलतान’मधील किसिंग सीनमुळे वाद

‘रझिया सुलतान’मध्ये सुरुवातीला राणीचा एकटेपणा, नंतर याकूतबरोबरचा रोमान्स या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. यामध्ये खाकून नावाच्या मदतनीसची भूमिका परवीन बाबीने साकारली होती. या खाकून व रझिया यांच्यातील जवळीक, रोमान्स सिनेमात दाखवला होता. अमरोही यांनी दोघींमध्ये रोमान्स दाखवण्यासाठी एक प्रेम गीत वापरलं होतं. यात दोघींमध्ये गालावर किस करण्याचा एक सीन होता. त्याकाळी पडद्यावर समलिंगी किस दाखवणं मोठी गोष्ट होती. या सीनमुळे चित्रपटाबद्दल नकारात्मकता पसरली आणि प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली होती.

हेही वाचा – फिल्मी करिअर ठरलं फ्लॉप, दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटूशी केलं लग्न; या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

‘रझिया सुलतान’साठी अमरोही यांनी घेतलेलं कर्ज

‘रझिया सुलतान’ चित्रपट तयार व्हायला बरीच वर्षे लागली होती. या चित्रपटासाठी शेकडो लोकांनी काम केलं होतं. अमरोही यांनी सिनेमा बनवायला इंडस्ट्रीतील खूप लोकांकडून कर्ज घेतलं होतं. त्यांनी क्रू मेंबर्सना चित्रपट रिलीज झाल्यावर पैसे देण्याचं वचन दिलं होतं. मात्र सिनेमा फ्लॉप ठरला, त्याचा परिणाम बॉलीवूडमधील इतर अनेक चित्रपटांवर झाला होता. बॉलीवूडवर आर्थिक संकट आलं होतं. चित्रपट फ्लॉप झाल्यावर अमरोही यांनी बहुतांश क्रू मेंबर्सना स्वतःच्या खिशातून पैसे दिले होते. मात्र काही वितरक आणि प्रदर्शकांना या सिनेमामुळे आर्थिक फटका बसला होता. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलंय.

हेही वाचा – घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल

या चित्रपटामुळे आर्थिक फटका बसूनही बॉलीवूड सावरलं, मात्र ते कमाल अमरोहीनं जमलं नाही. हा सिनेमा फ्लॉप झाल्यावर त्यांनी मुघल शासक बहादूरशाह जफरवर एक स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली, मात्र ती स्क्रिप्ट ते कधीच पूर्ण करू शकले नाही. १९९३ मध्ये कमाल अमरोही यांचे निधन झाले आणि ‘रझिया सुलतान’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

Story img Loader