प्रतिष्ठित ७७ वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ सुरू होऊन एका आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. खासकरून भारतातील चाहते आणि फॅशन प्रेमी ‘कान’च्या कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ऐश्वर्याचा ‘कान’ मधील यंदाचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही माजी मिस वर्ल्ड आणि लॉरिअल पॅरिसची ब्रँड ॲम्बेसेडर ऐश्वर्याने आपल्या जादुई लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५० वर्षीय ऐश्वर्याने फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या ‘मेगालोपोलिस’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी रेड कार्पेटवर वॉक केला. गोल्डन टच असलेला तिचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातावर प्लास्टर दिसून आलं. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेवत ऐश्वर्याने रेड कार्पेटवर वॉक केला आणि पोज दिल्या. ऐश्वर्याचे या सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ खूपच चर्चेत आहेत.

ऐश्वर्याने ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर वॉक केल्यानंतर लेक आराध्या तिच्याबरोबर हॉटेलमध्ये परत जाताना दिसली. यावेळी आराध्या आईची काळजी घेत होती. दरम्यान बुधवारी संध्याकाळी ऐश्वर्या मुंबई विमानतळावर तिची मुलगी आराध्या बच्चनसह फ्रेंच रिव्हिएराला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी ऐश्वर्याच्या हाताला असलेलं प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. हाताला प्लास्टर असलं तरी ऐश्वर्याने ज्या अदाकारीने व ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर वॉक केला, ते पाहून आता चाहते तिचं कौतुक करत आहेत.

ऐश्वर्या रायचे ‘कान २०२४’ मधील फोटो (फोटो सौजन्य – एपी)

“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”

‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दरवर्षी आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या ऐश्वर्याने यंदाही रेड कार्पेट गाजवलं. तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरं तर ऐश्वर्या व ‘कान फिल्म फेस्टिव्हल’चं नातं खूप जुनं आहे. ‘कान’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचं हे २२ वं वर्ष होतं. २००२ मध्ये तिने ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत ऐश्वर्याचे अनेक लूक चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. ‘कान’च्या थिमप्रमाणे तिचे लूक असतात.

ऐश्वर्या रायचे ‘कान २०२४’ मधील फोटो (फोटो सौजन्य – एपी)

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

दरम्यान, यंदा विविध क्षेत्रातील अनेक भारतीयांनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर वॉक केला. आलिया भट्ट, फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी, अभिनेत्री दीप्ती साधवानी, उद्योजिका नमिता थापर यांनी यंदाच्या रेड कार्पेटवर वॉक केला. तर कियारा अडवाणी, सोभिता धुलिपाला आणि अदिती राव हैदरी यादेखील ‘कान’च्या रेड कार्पेटवर दिसतील. यंदा मराठी अभिनेत्री छाया कदम यादेखील ‘कान’मध्ये सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injured aishwarya rai bachchan at cannes 2024 black and white attire photos and videos viral hrc