ऐश्वर्या राय बच्चन कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे. ती लोरियाल पॅरिसची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर आपल्याला ऐश्वर्याचा जादुई अंदाज पाहायला मिळणार आहे. बुधवारी संध्याकाळी ऐश्वर्या मुंबई विमानतळावर तिची मुलगी आराध्या बच्चनसह फ्रेंच रिव्हिएराला जाताना दिसली. यावेळी ऐश्वर्याच्या हाताला असलेलं प्लास्टर पाहून तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
विमानतळावर जखमी हातासह पोहोचलेल्या ऐश्वर्याने काळे ट्राऊझर व लांब निळा ओव्हरकोट घातला होता, तर आराध्याने पांढऱ्या स्वेटशर्टसह काळ्या रंगाची पँट घातली होती. विरल भयानी या पापाराझी अकाउंवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओंमध्ये ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहेत. ती तिचा हात जपून आराध्याला सांभाळत चालत होती. आईच्या हाताला दुखापत झाल्याने आराध्याने तिची बॅग उचलली होती.
“देवा, ती जखमी हात घेऊन कानमध्ये जाणार,” असं एका चाहत्याने लिहिलं. तर, ‘ती बरी असावी, अशी आशा व्यक्त करतो,’ अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘ऐश्वर्याला कानमध्ये पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही, ती आमची आवडती स्टार आहे,’ असं एका चाहत्याने म्हटलं आहे.
ऐश्वर्याच्या हातावरील प्लास्टर पाहून चाहते काळजीत पडले आहेत. पण दुसरीकडे ते तिचा कानमधील लूक पाहण्यासाठी खूप उत्साहित आहेत. दरवर्षी आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या ऐश्वर्याचा यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये कसा लूक असेल, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
ऐश्वर्या रायने २२ वर्षांपूर्वी २००२ मध्ये तिने कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत ऐश्वर्याचे अनेक लूक चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. कानच्या थिमप्रमाणे तिचे लूक असतात. यावेळी ऐश्वर्याबरोबर आराध्याही तिच्यासोबत गेली आहे. तीही आईबरोबर रेड कार्पेटवर दिसणार की नाही ते लवकरच कळेल.
जान्हवी कपूरच्या काकूचं पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विधान; म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना…”
दरम्यान, यावर्षी ऐश्वर्या रायसह कियारा अडवाणी, सोभिता धुलिपाला आणि अदिती राव हैदरी यादेखील कानच्या रेड कार्पेटवर दिसतील. त्यादेखील लोरियालच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. कानच्या रेड कार्पेटवर अनेक भारतीय सेलिब्रिटींची झलक पाहायला मिळत आहे. दिप्ती साधवानी, उद्योजक नमिता थापर यांचेही कानमधील फोटो समोर आले आहेत. यंदा मराठी अभिनेत्री छाया कदम यादेखील कानमध्ये सहभागी होणार आहेत.