बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान, ‘डॉन-३’ चित्रपटाबाबत मोठी नुकतीच समोर आली. चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी यांनी याबाबतची माहिती दिली.

रितेश यांनी नुकतंच फरहान अख्तर ‘डॉन ३’ची स्क्रिप्ट पूर्ण करण्यात व्यस्त असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर सगळेच या चित्रपटाच्या पुढील अपडेटसाठी उत्सुक झाले, आता मात्र शाहरुख खानने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. शाहरुख सध्या कमर्शियल चित्रपट करण्यास जास्त उत्सुक आहे जो जगभरातील प्रेक्षक बघणं पसंत करतील आणि ‘डॉन ३’ या साच्यात न बसणारा चित्रपट असल्याने त्याने हा चित्रपट करण्यास साफ नकार दिला आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “तो चित्रपट केवळ हृतिकसाठी…” करीना कपूरने सांगितलेलं ‘कहो ना प्यार है’मध्ये काम न करण्यामागील कारण

अशातच आता या ‘डॉन ३’मध्ये नवीन कलाकार दिसणार असल्याने वेगवेगळ्या चर्चा आपल्या कानावर पडत आहेत. शाहरुख ऐवजी आता ‘डॉन’ म्हणून कोण दिसणार याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. अशातच अभिनेता रणवीर सिंग हा ‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेत दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. समीक्षक आणि सिनेतज्ञ सुमित कडेल यांनी याबद्दल नुकतीच माहिती दिली आहे.

sumitkadel-post
फोटो : सोशल मीडिया

रणवीर सिंगचा फोटो शेअर कर एक्सेल एंटरटेनमेंट रणवीर सिंगसह काम करण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती हातात आलेली नाही. शाहरुखने या प्रोजेक्टपासून स्वतःला वेगळं केल्याने सध्या फरहान अख्तर या चित्रपटाच्या कथेवर पुन्हा काम करत आहे. रणवीर सिंगही त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे, पण ‘डॉन ३’मध्ये नेमकं कोण मुख्य भूमिका करणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Story img Loader