बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. करिअरबरोबरच अनन्याच्या वैयक्तिक आयुष्याचा जास्त चर्चा रंगताना दिसते. दिवाळीत अनन्याने मुंबईत स्वतःचं पहिलं घर घेतलं. धनत्रयोदशीनिमित्त अनन्याने घरात पूजाही केली होती. अभिनेत्रीने या पूजेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. अनन्याने स्वतःचं घर खरेदी केल्यानंतर चाहत्यांबरोबर अनेक कलाकरांनी तिचं अभिनंदन केलं होतं. दरम्यान एका फोटोमध्ये अनन्याने तिच्या नवीन घराची झलक शेअर केली आहे.
‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने केलंय इंटिरिअर डिझाईनिंग
अनन्याचे हे नवीन घर बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानने डेकोरेटेड केलं आहे. अनन्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौरीचे आभार मानले आहेत. अनन्याने आपल्या इन्स्टाग्रामवर गौरीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अन्याच्या घराची झलक पहायला मिळत आहे. अनन्याच्या घराचे इंटिरिअर पांढऱ्या आणि करड्या रंगाच्या शेडमध्ये करण्यात आलं आहे. फोटोमध्ये अनन्याच्या घरातील मोठा सोफा सेट बघायला मिळत आहे. सोफ्यासमोर पांढऱ्या रंगाचा टीपॉय आहे. सोफ्याच्या दोन्ही बाजूला टेबल लॅम्प ठेवण्यात आले आहेत. तसेच घरामध्ये अनेक ठिकाणी शोची झाडेही ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
अनन्याने गौरीबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं “माझं पहिलं घर, माझं स्वप्नातलं घरं. मला काय हवे होते हे तुमच्यापेक्षा दुसरं कोणीही समजू शकले नसते. धन्यवाद गौरी. हे माझ्यासाठी खूप खास आहे. अनन्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
गौरीने या बॉलीवूड कलाकारांच्याही घराचे केलंय इंटिरिअर डिझाईनिंग
अनन्या व्यतरिक्त गौरीने या अगोदर अनेक बॉलीवूड कलाकरांच्या घराचे इंटिरिअर डिझाईनिंग केलं आहे. यामध्ये करण जौहर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्राबरोबर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराचेही इंटिरिअल डिझाईनिंग केलं आहे.
हेही वाचा- “हा चित्रपट सुपरहीट होऊच शकत नाही…” जेव्हा रणबीर कपूरने केलेलं ‘कबीर सिंग’बद्दल मोठं वक्तव्य
अनन्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘ड्रीमगर्ल २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अनन्याबरोबर आयुष्यमान खुराना मुख्य भूमिकेत होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.