बॉलिवूड आणि प्रणयदृश्यं हे समीकरण जुनं नाही. त्यात आता खूप प्रगती झाली आहे. सध्याच्या घडीला इंटिमेट सीन्स, बोल्ड सीन्स हे सर्रास बघायला मिळतात. वेब सीरिज आल्यापासून तर हे सीन्स मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळत असतात. अशात बॉलिवूडमध्ये इंटिमेट को ऑर्डिनेटर, इंटिमसी को ऑर्डिनेटर हा ट्रेंड रुळतो आहे. याचा अर्थ चित्रपटाच्या सेटवर दोन कलाकारांमध्ये एखादा बोल्ड सीन शूट करण्याआधी सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणारी एक व्यक्ति.

इंटीमसी को-ऑर्डिनेटर फिल्म युनिटचाच एक भाग असतात. मुख्यत: हे को ऑर्डिनेटर अभिनेते, अभिनेत्री, परफॉर्मर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांच्यात चर्चा घडवून आणतात. सिनेमात जर कुठला भावनिक, बोल्ड किंवा सेन्सिटिव्ह सीन असेल तर त्याची एक निश्चित रुपरेषा आखली जाते.

सध्या बॉलिवूडमध्ये हे काम बघणारी पहिली इंटीमसी को-ऑर्डिनेटर आस्था खन्ना यामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच आस्थाने ‘पिंकव्हीला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली. नेमकं तिचं काम काय असतं शिवाय मोठमोठ्या स्टार्सबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव याबद्दल तिने बरीच माहिती दिली आहे. आस्थाने नेटफ्लिक्सवरील ‘क्लास’ या वेबसीरिजसाठीही इंटीमसी को-ऑर्डिनेटर म्हणून काम केलं आहे.

आणखी वाचा : ‘गहराईयाँ’मधील दीपिकाच्या बोल्ड सीन्ससाठी अशी घेतलेली मेहनत; इंटीमसी को-ऑर्डिनेटर आस्था खन्नाचा खुलासा

‘क्लास’ या वेबसीरिजमध्ये शालेयवयीन मुलांचे बरेच इंटीमेट सीन्स आपल्याला बघायला मिळाले. यामुळे ही वेब सीरिज चांगलीच चर्चेत होती. यातील बल्ली नावाच्या पात्रावर एक न्यूड सीन चित्रित करण्यात आला ज्यामध्ये शाळेतील बऱ्याच मुलांसमोर ते पात्र विवस्त्र फिरताना दिसतं. तो सीन नेमका कसा शूट केला याबद्दल आस्था खन्नाने खुलासा केला आहे.

आस्था म्हणाली, “जरी तो स्क्रीनवर न्यूड सीन दिसत असला तरी त्या पात्राचा पुढील भाग आम्ही कव्हर केला होता आणि त्याचा मागचा नग्न भाग हा फक्त कॅमेरासमोरच होता, आणि या भूमिकेसाठी अभिनेता निवडतानाच त्याला ही कल्पना दिलेली होती, शिवाय या पहिल्या सीझनमध्ये बल्ली या पात्राचे भरपूर इंटीमेट सीन्स आपल्याला बघायला मिळतील. हे पात्र साकारणारा अभिनेता सिवायल सिंग हासुद्धा एक उत्तम अभिनेता आहे, शिवाय स्वतःला दिलेलं पात्र आणि स्वतःची शरीरयष्टी याबाबत त्याचा आत्मविश्वास दांडगा आहे, त्यामुळे हा सीन शूट करताना तोदेखील सुरुवातीला थोडा चिंतेत होता, पण नंतर त्याने अगदी कसलाही संकोच न बाळगता सगळ्यांसमोर तो सीन दिला.”

आणखी वाचा : “एकमेव अभिनेत्री जी अजिबात…” सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचं कंगना रणौतबद्दलचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूडने आता इंटीमसी को ऑर्डिनेटरचा ट्रेंड स्वीकारला आहे. इंटीमेट सीन शूट होत असताना प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा असो अॅक्टर्सना तो सीन करण्यासाठी सहज वाटलं पाहिजे असं इंटीमेट को ऑर्डिनेटर्सचं लक्ष्य असतं.