बॉलिवूड आणि प्रणयदृश्यं हे समीकरण जुनं नाही. त्यात आता खूप प्रगती झाली आहे. सध्याच्या घडीला इंटिमेट सीन्स, बोल्ड सीन्स हे सर्रास बघायला मिळतात. वेब सीरिज आल्यापासून तर हे सीन्स मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळत असतात. अशात बॉलिवूडमध्ये इंटिमेट को ऑर्डिनेटर, इंटिमसी को ऑर्डिनेटर हा ट्रेंड रुळतो आहे. याचा अर्थ चित्रपटाच्या सेटवर दोन कलाकारांमध्ये एखादा बोल्ड सीन शूट करण्याआधी सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणारी एक व्यक्ति.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंटीमसी को-ऑर्डिनेटर फिल्म युनिटचाच एक भाग असतात. मुख्यत: हे को ऑर्डिनेटर अभिनेते, अभिनेत्री, परफॉर्मर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांच्यात चर्चा घडवून आणतात. सिनेमात जर कुठला भावनिक, बोल्ड किंवा सेन्सिटिव्ह सीन असेल तर त्याची एक निश्चित रुपरेषा आखली जाते.

आणखी वाचा : उर्फी जावेद करतीये तिच्या खास मैत्रिणीलाच डेट? ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

सध्या बॉलिवूडमध्ये हे काम बघणारी पहिली इंटीमसी को-ऑर्डिनेटर आस्था खन्ना यामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच आस्थाने ‘पिंकव्हीला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली. नेमकं तिचं काम काय असतं शिवाय मोठमोठ्या स्टार्सबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव याबद्दल तिने बरीच माहिती दिली आहे. दीपिका पदुकोणचा ‘गहराईयाँ’ हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा सुरुवातीला इंटीमसी को ऑर्डिनेटर हा शब्द चर्चेत आला होता. दीपिकाचा जो बोल्ड अवतार या सिनेमात बघायला मिळाला त्यामागे काही टेक्निकल लोकांचा वाटा होता. हे कामसुद्धा आस्थाकडेच होतं.

त्यावेळी दीपिकाबरोबर काम करतानाचा अनुभव आणि एक सुपरस्टार म्हणून अशा बोल्ड सीन्ससाठी तिची मानसिकता याविषयी आस्थाने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. आस्था म्हणाली, “जेव्हा तुम्ही दीपिकासारख्या अभिनेत्रीबरोबर काम करता तेव्हा त्यांना या सगळ्याबद्दल कल्पना असते. कोणता कॅमेरा अॅंगल लावणार आहे, हा सीन नेमका का चित्रित करणार आहेत, कथा आणि पात्रं यांचं गांभीर्य याबद्दल त्यांना आधीच कल्पना असते. इंटीमेट सीन्सच्या शूटिंगच्या बाबतीत दीपिका ही अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री आहे, आपल्या दिग्दर्शकाला नेमकं काय हवं आहे आणि त्याच्यावर आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून ती काम करते. त्यावेळी दीपिका ही फक्त त्या पात्राचा विचार करते आणि तिच्यातला तो आत्मविश्वास हा फार कमी कलाकारांमध्ये पाहायला मिळतो.”

इतकंच नव्हे तर ‘गहराईयाँ’च्या दरम्यान दीपिकाने आस्था खन्नाबरोबर बरेच इंटीमसी वर्कशॉप आणि अभिनयाचे वर्कशॉपही केले ज्यामुळे तिला ही बोल्ड भूमिका साकारायला आणखी मदत झाली. बॉलिवूडने आता इंटीमसी को ऑर्डिनेटरचा ट्रेंड स्वीकारला आहे. इंटीमेट सीन शूट होत असताना प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा असो अॅक्टर्सना तो सीन करण्यासाठी सहज वाटलं पाहिजे असं इंटीमेट को ऑर्डिनेटर्सचं लक्ष्य असतं.