अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीने १५ फेब्रुवारीला त्यांच्या दुसऱ्या मुलाचं म्हणजेच अकायचं स्वागत केलं. अनुष्का सध्या अकायबरोबर लंडनमध्ये राहत आहे आणि विराट त्याच्या आयपीएलच्या सामन्यासाठी भारतात सज्ज झाला आहे. आजपासून आयपीएल सुरू झाली आहे आणि आजच्या पहिला सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन बहुचर्चित संघ आमनेसामने येणार आहेत.
विराट भारतात परतल्याने त्याचे असंख्य चाहते त्याची मॅच पाहण्यास उत्सुक आहेत. तसेच अनुष्का तिच्या पतीला सपोर्ट करण्यासाठी भारतात येणार का? याचीसुद्धा चाहते आतुरतेने वाट पाहतायत.
बॉलीवूड लाईफच्या माहितीनुसार, आयपीएल दरम्यान अनुष्का भारतात परत येण्याची शक्यता आहे. अकाय आता दीड महिन्यांचा होईल आणि जन्माच्या एक महिन्यानंतर नवजात मुलांना बहुतेक विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. अकाय सध्या त्याची आई अनुष्का आणि बहीण वामिका कोहलीसह लंडनमध्ये राहतोय.
हेही वाचा… एल्विश यादवला अखेर जामीन मंजूर; सापांचे विष पुरविल्याप्रकरणी झाली होती अटक
विराटच्या सामान्यादरम्यान अनुष्का नेहमी त्याला सपोर्ट करत आली आहे. आजपर्यंत असं कधीचं झालं नाही की विराटचा सामना आहे आणि अनुष्काची तिथे हजेरी नाही. म्हणूनचं या आयपीएलच्या या सामन्यांमध्ये अनुष्का कधीही भारतात परतेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यानसुद्धा गुप्तता पाळत अनुष्काने विराटच्या सामन्यांना हजेरी लावली आहे.
दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षानंतर या कपलने २०२१ मध्ये त्यांची पहिली मुलगी वामिकाचं स्वागत केलं. तर फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी अकायच्या जन्माची गुड न्यूज दिली. अनुष्का सध्यातरी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१८ मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफबरोबर अनुष्का ‘झिरो’मध्ये शेवटची दिसली होती.