सध्या देशभरात IPL चा उत्साह पाहायला मिळत आहे. बहुतांश कलाकार मुंबईचे रहिवासी असल्याने हे सेलिब्रिटी अनेकदा मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करण्यासाठी वानखेडेवर जातात. याआधी मराठी अभिनेता गौरव मोरे मॅच पाहण्यासाठी स्टेडियमला गेला होता. आता देशमुखांची लाडकी सून जिनिलीया आपल्या दोन मुलांसह मॅच पाहण्यासाठी गेली आहे. तिने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.
आयपीएल २०२४ चा २९ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या संघांमध्ये खेळवण्यात येत आहे. ही मॅच पाहण्यासाठी अभिनेत्री जिनिलीया देशमुख वानखेडेला गेली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ मालिका! ‘रमा माधव’च्या वेळेत केला ‘असा’ बदल, जाणून घ्या…
वानखेडेवर जिनिलीयाबरोबर तिची दोन्ही मुलं रियान आणि राहील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांनी मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करून हातात मुंबई संघाचे झेंडे पकडले आहे. जिनिलीयाने लाइव्ह मॅचदरम्यानचे काही क्षण आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
दरम्यान, रितेश देशमुखचं संपूर्ण कुटुंब कायम चर्चेत असतं. जिनिलीया-रितेशच्या मुलांच्या संस्कारांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक करण्यात येतं. काही दिवसांपूर्वी हे संपूर्ण कुटुंब फुटबॉल मॅच पाहण्यासाठी परदेशात गेलं होतं. सध्या कामानिमित्त रितेश बाहेर असून जिनिलीया मुलांसह मॅचचा आनंद घेताना दिसली. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती आमिर खानबरोबर एका नव्या चित्रपटात झळकणार आहे.