आमिर खानची मुलगी आयरा खान व मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. आधी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न करून त्यांनी उदयपूरला नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या समवेत क्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. नंतर मुंबईत जंगी रिसेप्शन पार्टी दिली होती. लग्नानंतर आयरा आणि नुपूर त्यांच्या हनीमूनसाठी बालीला गेले आहेत. लवकरच ते तिथून परत येणार आहे. पण येताना तिथली एक खास आठवण आयरा आणि नुपूर घेऊन येत आहेत.
आयरा आणि नुपूरने मॅचिंग टॅटू काढले आहेत. आयराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम चॅनलवर याबद्दलची स्टोरी शेअर केली आहे. ज्यात कासवाच्या जोडीचा टॅटू आयराने काढला आहे. या स्टोरीला कॅप्शन देत आयरा म्हणाली, “हा हे टॅटू खरचं खूप छान आहे, या टॅटूला मी दिवसभर न्याहाळणार आहे.” आयराने तिच्या मानेखाली खांद्याजवळ सारख्या दिसणाऱ्या दोन कासवांचे टॅटू काढले आहेत.
टॅटूचा फोटो नुपूरनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोत नुपूरच्या हातावरही एक टॅटू दिसत आहे. हा टॅटू त्याच्या बायसेप्सवर काढला असून तोही एका कासवाचा आहे. ही आठवण शेअर करताना दोघही खूप आनंदात दिसत आहेत. “टेकिंग सम आयर्लंड बॅक” अस कॅप्शन देत नुपूरने टॅटूमेकरचे आभार मानले. आयरा आणि नुपूरने त्यांची बाली ट्रीप चांगलीच एंजॉय केलेली दिसतेय.
दरम्यान, आयरा आणि नुपूरच्या लग्नसोहळ्यात तिचे वडील आमिर खान, आई रीना दत्ता, भाऊ जुनैद खान यांच्यासह तिच्या सावत्र आई किरण रावनेही हजेरी लावली होती. तिचे नऊवारी साडीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.