Ira Khan and Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लेक आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा लवकरच मुंबईत पार पडणार आहे. सध्या कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आयरा-नुपूरचं केळवण अभिनेत्री मिथिला पालकरच्या घरी करण्यात आलं होतं. त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये आयरा-नुपूरच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहेत.

शिखरे कुटुंबीय लाडक्या सुनेचं जोरदार स्वागत करणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आयरा खानच्या सासरी तिच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ३ जानेवारीला आयरा आणि नुपूर यांचा विवाहसोहळा ताज लँड्स एंडमध्ये पार पडणार आहे. यानंतर दोघेही पाहुण्यांना रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : नाना पाटेकर अशोक सराफ यांना म्हणाले होते, “पैसेच परत करतोय रे, ती वेळ…”

लग्नानिमित्त आमिर खानच्या होणाऱ्या जावयाच्या म्हणजेच नुपूर शिखरेच्या संपूर्ण घरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्याची आई व इतर नातेवाईक नुपूरचं औक्षण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव करत “तुम्हा दोघांच्या लग्नासाठी आम्ही प्रचंड उत्साही आहोत” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : Video: लग्नाच्या ५ दिवसाआधी अरबाज खानने पत्नी शुराला फिल्मी स्टाइलमध्ये केलं होतं प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे.

Story img Loader