बॉलीवूड सेलिब्रिटींचा फिटनेस ट्रेनर व अभिनेता आमिर खानचा जावई नुपूर शिखरे कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुपूर शिखरे सध्या थायलंडमधील फुकेत इथं व्हेकेशन एंजॉय करत आहे. नुपूर पत्नी आयरा खानसोबत नाही तर आई प्रितम शिखरेबरोबर विदेशात फिरायला गेला आहे. त्याने फुकेत ट्रिपमधील काही सुंदर फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर फुकेत ट्रिपचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तो आईबरोबर फुकेतमध्ये एंजॉय करताना दिसत आहे. त्याने राइड बूक करण्यापासून ते रस्त्यांवर फुकेतच्या रस्त्यांवर धमाल करतानाचे क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

Video: “तू फक्त मातीच खा”, प्रितम शिखरेंचा नुपूरला टोला; माय-लेकाचा व्हिडीओ पाहून मराठी अभिनेत्रींना हसू आवरेना

फुकेतचे स्वच्छ समुद्रकिनारे, स्कुबा डायव्हिंग, तिथलं खान-पान या गोष्टींची झलक नुपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळते. या व्हिडीओंमध्ये नुपूर आईबरोबर स्कुटीवर फिरताना दिसत आहे.

नुपूर शिखरेचं आईसह ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील; पत्नी आयरा खानची खास कमेंट, तर सुश्मिता सेनला हसू आवरेना

नुपूरने फुकेतमध्ये अनेक मजेशीर रील बनवले आहेत. त्यात फुकेतमधील अपेक्षा आणि रिअॅलिटी दाखवणारा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ वॉटर स्पोर्ट्सचा आहे.

एका दिवस.. कला, कॉफी, समुद्रकिनारी वेळ घालवणं आणि थोडा व्यायाम, असं कॅप्शन देत नुपूरने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

नुपूरचे हे व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. लग्नानंतरही तो ज्याप्रमाणे आईची काळजी घेतोय तिच्याबरोबर फिरायला जातोय, हे पाहून चाहते नुपूरसाठी कमेंट्स करत आहेत. ‘लग्नानंतर मुलं आपल्या आईची काळजी घेत नाहीत, पण तू ज्या पद्धतीने तिच्याबरोबर असतोच ते खरंच खूप कौतुकास्पद आहे,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. नुपूर व त्याच्या आईचं नातं पाहून अनेकांनी या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ira khan husband nupur shikhare phuket vacation with mother see videos of water sports hrc