बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज लग्नबंधनात अडकणार आहे. आयरा व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून लग्नाआधीचे कार्यक्रम पार पडत आहेत. मंगळवारी नुपूर व आयराचा हळदी कार्यक्रम झाला. यासाठी आमिरच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना दत्ता व किरण राव मराठमोळा साज करून पोहोचल्या होत्या.

मंगळवारी दुपारी नुपूर शिखरेची हळद झाल्यानंतर रात्री आयरा खानचा मेहेंदीचा कार्यक्रम होता. तिचा मेहेंदीचा कार्यक्रम आमिर खान किंवा नुपूरच्या घरी नाही तर सलमान खानच्या घरी पार पडला. सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ला आयराच्या मेहेंदीसाठी खास सजवण्यात आलं होतं. तसेच आमिर मुलगा जुनैदबरोबर सलमानच्या घरी पोहोचला होता.

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

आमिरची मुलगी आयरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी आज (३ जानेवारी २०२४ रोजी) लग्न करणार आहे. सलमान खानने त्याच्या घरी आमिरच्या लाडक्या लेकीच्या मेहेंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मंगळवारी आमिर खान, त्याची मुलं जुनैद व आझाद आणि पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासह सलमान खानच्या घरी मुलीच्या मेहेंदी कार्यक्रमात सहभागी झाले होते. आमिर व सलमान खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे सलमानच्या घरी आमिरच्या मुलीचा मेहेंदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आमिर खानची मुलगी आयरा खान व नुपूर शिखरे आज विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा आणि नुपूर शिखरे मुंबईतील ताज लँड्स एंड इथे रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत. यानंतर त्यांचे रिसेप्शन आयोजित केले जाईल. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतील.

Story img Loader