आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरे विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांचे लग्न नोंदणी पद्धतीने पार पडले. त्यांच्या लग्नातील काही व्हिडीओ समोर आले आहेत. नुपूर व आयराच्या लग्नाला मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी हजेरी लावली.
लग्नात आयरा खानने धोती चोली ड्रेस परिधान केला होता. तर नुपूर मात्र शॉर्ट्सवर होता. आयराची आई रीना यांनी छानसा ड्रेस घातला होता. तर आमिरने लेकीच्या लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता व धोती निवडली होती. किरण राव सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. तर, नुपूर शिखरेच्या आई प्रीतम शिखरे यांनी लाल रंगाची साडी नेसली होती. आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे.
Video: नुपूर शिखरे धावत पोहोचला लग्नस्थळी, ढोल वाजवत केला जोरदार डान्स, वरातीचे व्हिडीओ व्हायरल
आयरा व नुपूर यांच्या लग्नाला मुकेश व नीता अंबानीही पोहोचले. त्यांचं आमिर खानने स्वागत केलं. त्यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याशिवाय या लग्नाला बरेच पाहुणे उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून आमिर खानची लाडकी लेक आयरा व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अखेर त्यांचं लग्न नोंदणी पद्धतीने पार पडलं आहे. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही लवकरच होणार आहे. या रिसेप्शन सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळेल.