Ira Khan-Nupur Shikhare Wedding: सध्या आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरे लग्नामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर आता पारंपरिक पद्धतीने आयरा व नुपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूरमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या लग्नापूर्वीचे समारंभ सुरू आहेत. आज (८ जानेवारी) आयरा-नुपूरचा मेहंदी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मेहंदी सोहळ्यासाठी आयरा-नुपूरने खास लूक केला होता. आयरा लाइट ब्राउन आणि ऑफ व्हाइट शेडच्या लेहंग्यामध्ये पाहायला मिळाली. या लेहंग्यावर तिने छान ज्वेलरी घातली होती. तसंच नुपूर मरुन नेहरू जॅकेट आणि फिकट गुलाबी रंगाच्या कुर्तामध्ये दिसला. आयरा-नुपूरचा हा लूक चांगलाच चर्चेत आहे. अशातच मेहंदी सोहळ्यातला नुपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो काही मराठी कलाकारांबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – Video: सावत्र आई अन् भावाचा आयरा खानच्या लग्नात स्पेशल परफॉर्मन्स, व्हिडीओ चर्चेत…

आयरा-नुपूरच्या मेहंदी सोहळ्यातील हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सुरुवातीला आयरा आपल्या मैत्रिणींबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर बादशाहच्या लोकप्रिय ‘जुगनू’ गाण्यावर नुपूर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. नुपूरसह काही मराठी कलाकार या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ मेनन व अभिनेत्री मिथिला पालकरसह नुपूर ‘जुगनू’ गाण्याची हूक स्टेप करत आहे.

हेही वाचा – लेकीचं टिकलीबाबत ते वाक्य ऐकून ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचे कान झाले तृप्त, म्हणाली, “मेरा देश बदल रहा है…”

आयरा-नुपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, दोघं १० जानेवारीला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader