Ira Khan Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लाडकी लेक आयरा खान व नुपूर शिखरे यांचा लग्नसोहळा नुकताच उदयपूरमध्ये पार पडला. या जोडप्याच्या शाही लग्नातील बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह केल्यावर आयरा-नुपूर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. लग्नानंतर उदयपूरहून मुंबईत येताना त्यांनी माध्यमांसमोर पोज दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरल भय्यानी या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर आयरा खान व नुपूर शिखरेचा विमानतळावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आयराने निळ्या रंगाचं टीशर्ट-शॉर्ट पँट आणि त्यावर ऑफ व्हाइट रंगाचा श्रग परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, नुपूरने लग्नानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर येताना बेबी पिंक रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट असा वेस्टर्न लूक केला होता.

हेही वाचा : आयरा खान – नुपूर शिखरेचा Liplock करतानाचा फोटो व्हायरल, ख्रिश्चन पद्धतीत पार पडला आमिर खानच्या लेकीचा विवाहसोहळा

दरम्यान, उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडण्याआधी आयरा खान व नुपूर शिखरेचं मुंबईत ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न झालं होतं. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.

हेही वाचा : Video: लाडक्या लेकीला लग्नाच्या बेडीत अडकताना पाहून आमिर खानच्या डोळ्यात पाणी, व्हिडीओ व्हायरल

आयरा खान व नुपूर शिखरेने आता मुंबईत बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. याशिवाय या दोघांच्या लग्नाला मिथिला पालकर, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये असे बरेच मराठी कलाकार उपस्थित होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ira khan nupur shikhare first public appearance after royal wedding in udaipur sva 00