Ira Khan And Nupur Shikhare Wedding: आमिर खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान उद्या (३ जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आयरा सातफेरे घेऊन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे सध्या आयरा आणि नुपूरच्या घरी लग्नाची लगबग सुरू आहे. आज आयरा आणि नुपूरला हळद लागणार आहे, याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासंबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिर खानचा होणार जावई हा मराठी आहे. तो पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहेत. Fitnessismची सुरुवात त्याने केली आहे. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान, आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. याशिवाय त्याने दशकभर सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. अशा लोकप्रिय फिटनेस ट्रेनरशी आमिरची लेक आयरा लग्नगाठ बांधणार आहे. आज दोघांची हळद असून याची जोरदार तयारी सुरू आहे. हळदीसाठी आयराची आई म्हणजे रीना दत्ताने खास मराठमोळा लूक केला आहे. या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: चुलीवर भाकऱ्या अन् ‘जमाल कुडू’वर जबरदस्त डान्स…, प्राजक्ता माळीने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला ३१ डिसेंबर

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर रीना दत्ताचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रीना दत्ता विहीणबाईंबरोबर दिसत आहे. लेकीच्या हळदीसाठी खास हिरव्या रंगाची नऊवारी रीनाने परिधान केली आहे. तिचा हा मराठमोळा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – नऊवारी साडी, केसात गजरा अन्…; आयरा खानच्या लग्नविधीत सावत्र आईचा थाट, विहीणबाईंबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

आयरा आणि नुपूरची भेट २०२०मध्ये लॉकडाऊन दरम्यान झाली होती. यावेळी आयरा आमिरच्या घरी राहत होती. यादरम्यान नुपूर ट्रेनिंग देण्यासाठी आमिरच्या घरी येत असतं. तेव्हा दोघांची भेट झाली. मग आयरा आणि नुपूरची चांगली मैत्री झाली आणि हे मैत्रीचं नातं प्रेमात रुपांतरीत झालं. आता दोघं ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर आमिर शाही रिसेप्शन सोहळा आयोजित करणार आहे. १३ जानेवारीला रिसेप्शन सोहळा असून यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ira khan nupur shikhare haldi ceremony aamir khan ex wife reena dutta maharashtrian look video viral pps