Ira Khan-Nupur Shikhare Sangeet Video: आमिर खानची लेक आयरा खान विवाहबंधनात अडकणार आहे. ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर आता ते उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधतील. त्यापूर्वी मंगळवारी आयराचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
संगीत सोहळ्यात आयरा व नुपूरच्या एंट्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आयरा व नुपूर दोघेही सुंदर दिसत आहेत. नुपूरने सूट घातला होता तर आयराने लेहेंगा चोली व त्यावर लाल रंगाची हुडी घातली होती.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये आमिर खान, त्याची दुसरी पत्नी किरण राव, मुलगा आझाद हे सर्वजण संगीत सोहळ्यात परफॉर्म करताना दिसत आहेत. ‘फुलों का तारों का, सबका केहना है, एक हजारो में मेरी बहना है’ हे गाणं या तिघांनी मिळून गायलं.
आयरा व नुपूरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ चर्चेत आहेत. चाहते आमिर, किरण व आझादनी गायलेल्या गाण्याच्या व्हिडीओवर कमेंट्स करून कौतुक करत आहेत. आयरा व नुपूरचा संगीत सोहळा थाटात पार पडला.