आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाची खूप दिवसांपासून चर्चा होती. आज (३ जानेवारी रोजी) सायंकाळी ते विवाहबंधनात अडकले. आयराने मराठमोळ्या नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. नुपूर व आयराचा आंतरधर्मीय लग्न आहे. दोघांच्या लग्नानंतर त्यांच्या रिसेप्शनमधील फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘विरल भयानी’ या पापाराझी अकाउंटवरून काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यात नुपूर व आयरा यांनी मंचावर एंट्री घेतली, तो क्षण दिसत आहे. व्हिडीओत आयराने धोती चोली ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय. तसेच केस मोकळे सोडून दागिन्यांनी लूक पूर्ण केला. तर नुपूरने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.

Videos: आयरा खान व नुपूर शिखरे यांनी नोंदणी पद्धतीने केलं लग्न, मुकेश अंबानींनी पत्नीसह लावली हजेरी, व्हिडीओ आले समोर

एका व्हिडीओमध्ये नुपूर व आयराचे कुटुंबिय फोटोसाठी पोज देत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आमिर खान व त्याच्या दोन्ही पूर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण राव, त्याची मुलं जुनैद व आझाद तसेच नुपूरची आई प्रीतम शिखरे दिसत आहेत. या सर्वांनी या नवविवाहित जोडप्याबरोबर मंचावर पोज दिल्या.

दरम्यान, नुपूर व आयराने नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. कमेंट करून त्यांना लग्नासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ira khan nupur shikhare wedding aamir khan kiran rao reena datta family photo viral hrc