Ira Khan-Nupur Shikhare Wedding : बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या लेकीच्या लग्नसोहळ्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. आयरा खान व नुपूर शिखरे ३ जानेवारीला मुंबईत नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकले. यानंतर या जोडप्याचा शाही लग्न व रिसेप्शन सोहळा राजस्थानमधील उदयपूरमध्ये पार पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयरा व नुपूर या दोघांचं ८ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न व त्यानंतर दोघांकडून रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या या लग्नसोहळ्यासाठी आयरा-नुपूरचे मित्र व कुटुंबीय उदयपूरला पोहोचले आहेत. या दोघांच्या लग्नासाठी मराठी कलाविश्वातील अभिनेत्री मिथिला पालकर व अभिनेता सिद्धार्थ मेनन देखील उपस्थित राहणार आहेत.

आयराने नुकताच तिच्या रिसेप्शन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. राजस्थानमधील ताज लेक पॅलेजमध्ये या दोघांची रिसेप्शन पार्टी पार पडणार आहे. या जोडप्याच्या रिसेप्शन सोहळ्याची तळहाताएवढी निमंत्रण पत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : आयरा खानपेक्षा श्रीमंत आहे नुपूर शिखरे, लग्नानंतर दोघं आहेत ‘इतक्या’ संपत्तीचे मालक

निमंत्रण पत्रिकेच्या पृष्ठभागावर ‘I & N’ म्हणजेच आयरा आणि नुपूर असं लिहिण्यात आलं आहे. ही पत्रिका दिसायला तळहाताएवढी असली तरी, संपूर्ण उघडल्यावर यात लग्नसोहळ्यातील विधींचा संपूर्ण मजकूर पाहायला मिळत आहे. आयरा-नुपूरच्या रिसेप्शनची ही हटके निमंत्रण पत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक अडकले विवाहबंधनात, प्रियाने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

आयरा खान

दरम्यान, आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. इटलीमध्ये झालेल्या ‘आयर्न मॅन- इटली’ स्पर्धेत नुपूर सहभागी झाला होता. याच स्पर्धेदरम्यान त्याने सगळ्यांसमोर आयराला प्रपोज केलं होतं.