Ira Khan Nupur Shikhare Wedding : बॉलीवूड अभिनेता व मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. याचं कारण म्हणजे त्याची लाडकी लेक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आयरा खान ३ जानेवारीला तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. सध्या दोघांच्याही घरात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय या जोडप्याच्या लग्नविधींना देखील सुरुवात झालेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयरा-नुपूरचं लग्न मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने पार पडणार आहे. दोघांचाही साखरपुडा नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडला होता. यानंतर आयरा-नुपूरचे चाहते ते दोघेही लग्न केव्हा करणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ३ जानेवारीला या दोघांचा शाही विवाहसोहळा मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये पार पडणार असल्याचं समोर आलं आहे. लेकीचं लग्न पार पडल्यावर आमिर खानने सेलिब्रिटी व कुटुंबीयांसाठी दिल्ली व जयपूरमध्ये रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन केलं आहे.

हेही वाचा : नऊवारी साडी, केसात गजरा अन्…; आयरा खानच्या लग्नविधीत सावत्र आईचा थाट, विहीणबाईंबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

सध्या आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. आयराची आई रिना दत्ता व तिची सावत्र आई किरण राव सकाळी होणाऱ्या जावयाच्या घरी हळद घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी या दोघींनीही नऊवारी साडी नेसली होती. या जोडप्याच्या हळदी समारंभातील एक फोटो नुपर शिखरेच्या जवळच्या मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये आमिरच्या होणाऱ्या जावयाला परंपरेनुसार औक्षण करून हळद लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : लेकीच्या लग्नानिमित्त आमिर खानच्या घरी जय्यत तयारी सुरू, आकर्षक रोषणाईने सजलं घर

नुपूर शिखरे हळद

दरम्यान, लेकीच्या रिसेप्शन सोहळ्याला आमिर खानने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवल्याच्या चर्चा आहेत. सलमान खान, जुही चावला, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, शाहरुख खान, करीना कपूर खान असे बडे कलाकार आमिरच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्याला येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ira khan nupur shikhare wedding first photo viral of their haldi ceremony sva 00