आयरा खान व नुपूर शिखरे यांचं अनोखं लग्न खूपर चर्चेत राहिलं. आमिर खानच्या लेकीने मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेची लग्नगाठ बांधली. आधी त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि नंतर ते उदयपूरमध्ये विवाह बंधनात अडकले. आता आयराने तिच्या लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आयराने उदयपूरमध्ये सोहळ्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहेत. ज्यामध्ये त्यांच्या लग्नाची झलक पाहायला मिळते. नुपूर व आयरा लग्नात भावुक होतात. नुपूरला लग्नाचे वचन देताना भरून येतं आणि हे सगळं पाहून आमिरलाही अश्रू अनावर होतात. इतकंच नाही तर लग्नात सर्वजण मनसोक्त डान्स करतात, हेही व्हिडीओत दिसतंय. आमिर खान आयरा, पहिली पत्नी रीना व विहीणबाई प्रितम शिखरे यांच्याबरोबर डान्स करताना दिसतो.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Adorable video of elderly couple dancing to Punjabi song Kala Sha Kala goes viral
“काला शा काला”, पंजाबी गाण्यावर थिरकले आजी-आजोबा; मनमोहक व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Kareena Kapoor At Taimur School Event
तैमूरला डान्स करताना पाहून भलतीच खूश झाली करीना कपूर! लेकाचा व्हिडीओ काढला अन् मध्येच उठून…; पाहा व्हिडीओ
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
Shah Rukh Khan Son Abram and Aishwarya Rai daughter performance
Video : आराध्या-अबरामचा शाळेत एकत्र परफॉर्मन्स! शाहरुख खान व ऐश्वर्या रायचा आनंद गगनात मावेना, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका सुंदर हॉटेलमध्ये आयरा व नुपरचा हा स्वप्नवत विवाहसोहळा पार पडला. आमिर विहीणबाईंबरोबर डान्स करतो, तर नुपूर सासूबाई रीना दत्ताबरोबर डान्स करताना दिसतो. रीना दत्ता व प्रितम शिखरे एकमेकांना मिठी मारताना दिसतात. त्यानंतर आमिर, रीना, प्रितम, जुनैद, नुपूर व आयरा हे सर्व जण एकत्र येतात. लग्नातील हे खास क्षण पाहून अनेक पाहुणे भावुक झाल्याचं पाहायला मिळतं.

२१.२ मिलियन प्रेक्षकांनी २०२३ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला ‘हा’ वादग्रस्त बॉलीवूड चित्रपट; तुम्ही बघितलाय का?

आयरा व नुपूरच्या लग्नातील या टीझर व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर लग्नात उपस्थित राहिलेल्या अनेक मित्र-मैत्रिणींनी कमेंट्स करत या दोघांना सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader