बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान व पूर्वाश्रमीची पहिली पत्नी रीना दत्ता यांची लेक आयरा काल (३ जानेवारी) लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर नोंदणी पद्धतीने आयराने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तसेच लग्नातील दोघांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयरा व नुपूरच्या लग्नाची लूकविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे.
आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची चर्चा त्यांचं केळवण झाल्यामुळे सुरू झाली होती. आमिरची लाडकी लेक केव्हा लग्न करते? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर काल आयराने नोंदणी पद्धतीने नुपूरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. यापूर्वी कुठल्याही सेलिब्रिटींच्या मुलांचा असा लग्नसोहळा पाहिला नसेल तसा आयरा व नुपूरचा झाला. दोघांचा हटके अंदाज लग्नात पाहायला मिळाला.
हेही वाचा – ‘या’ मराठी अभिनेत्रीने लिहिले होते ‘सिता रामम्’ चित्रपटाचे हिंदी संवाद, अवघ्या ५ दिवसांत पूर्ण केलं होतं काम
आयराचा नवरा नुपूर बनियन व शॉर्ट्सवर घरातून आठ किलोमीटर धावत लग्नस्थळी पोहोचला होता. त्यानंतर त्याने त्याच पेहरावात लग्न केलं. पण नंतर नुपूर शेरवानीवर पाहायला मिळाला. आयराने लग्नासाठी खास हटके लूक केला होता. हेरम पॅन्ट, ब्लू रंगाच ब्लाउज आणि त्यावर ओढणी घेतली होती. तसेच यावर कोल्हापूरी चप्पल, स्मार्टवॉच, मोकळे केस सोडले होते. तिचा हा हटके लूक नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. या लूकवरून आयराला ट्रोल केलं आहे.
“नवरी कमी आणि आखाड्यात उतरणारी मुलगी वाटतं आहे”, “हिच चप्पल गेल्या दोन दिवसांपासून घालून ही फिरत आहे”, “सकर्सचे कपडे का घातले आहेत?”, “आमिर भाई तुमच्या मुलीकडे दुसरी चप्पलचं नाहीये का?”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – Video: नुपूर शिखरे धावत पोहोचला लग्नस्थळी, ढोल वाजवत केला जोरदार डान्स, वरातीचे व्हिडीओ व्हायरल
एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “इतक्या मोठ्या सुपरस्टारची मुलगी स्वतःच्या लग्नात कशी तयार झाली आहे…निदान चप्पल तर बदलली पाहिजे होती.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “नवरी वाटतंच नाही.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल, “हा नागिन ड्रेस आहे.”
दरम्यान, आयरा आणि नुपूरची भेट २०२०मध्ये लॉकडाऊन दरम्यान झाली होती. यावेळी आयरा आमिरच्या घरी राहत होती. यादरम्यान नुपूर ट्रेनिंग देण्यासाठी आमिरच्या घरी येत असतं. तेव्हा दोघांची भेट झाली. मग आयरा व नुपूरची चांगली मैत्री झाली आणि हे मैत्रीचं नातं प्रेमात रुपांतरीत झालं.