Ira Khan wedding: बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या लेक आयरा खानच्या लग्नात व्यस्त आहे. ३ जानेवारीला आमिरच्या लेकीचं नोंदणी पद्धतीत लग्न झालं. त्यानंतर आता उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आमिर संपूर्ण कुटुंबासह उदयपूरमध्ये पोहोचला आहे. अशातच आमिरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो पूर्वाश्रमीची दुसरी पत्नी किरण रावसह जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमिर खानचा हा व्हायरल व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आमिर ‘ठरकी छोकरो’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्याबरोबर पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव देखील थिरकताना दिसत आहे. आमिरचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘चारचौघी’ नाटकातील अभिनेता अडकला लग्नबंधनात, मुक्ता बर्वेसह अनेक कलाकारांनी लावली होती हजेरी

अभिनेत्याचा या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “पीके स्टाइल डान्सिंग.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “पीके आहेस का?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “पीकेच्या जगातील लग्न.”

हेही वाचा – आयरा खानपेक्षा श्रीमंत आहे नुपूर शिखरे, लग्नानंतर दोघं आहेत ‘इतक्या’ संपत्तीचे मालक

दरम्यान, आज (७ जानेवारी) सूफी नाइट आयोजित करण्यात आली आहे. तर उद्या, ८ जानेवारीला मेहंदी सोहळा होणार आहे. विशेष म्हणजे उदयपूरच्या स्थानिक महिला आयराला मेहंदी काढणार आहेत. त्यानंतर ९ जानेवारीला मेवाड लॉनमध्ये संगीत सोहळा रंगणार आहे आणि १० जानेवारीला मयूर बागमध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे. असा शाही लग्नसोहळा आयरा-नुपूरचा पाहायला मिळणार आहे.