Ira Khan Nupur Shikhare Wedding : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज लग्नबंधनात अडकणार आहे. आयरा मराठमोळ्या नुपूर शिखरेशी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी दोघांची हळद व मेहेंदी समारंभ पार पडला, त्यानंतर आज लग्न होणार आहे. लग्नापूर्वी नुपूर शिखरे मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
घरातून धावत लग्नस्थळी पोहोचला होता. नंतर त्याने ढोल वाजवत मनसोक्त डान्स केला. पाहुण्यांच्या गर्दीत तो डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नुपूर शॉर्ट्सवर धावत लग्नस्थळी पोहोचला आणि नंतर तिथे पाहुण्यांबरोबर जोरदार डान्स केला. त्याच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
नुपूर शिखरेने त्याच्या लग्नाच्या वरातीत स्वतः ढोल वाजवला आणि त्याच्या कुटुंबाबरोबर डान्स केला. आयरा खानचा होणारा पती नुपूरच्या या अनोख्या वरातीची जोरदार चर्चा होत आहे.