प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी काल रात्री मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक बी-टाऊन सेलिब्रिटी आणि फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित लोक सहभागी झाले होते. यामध्ये उर्फी जावेदच्या नावाचाही समावेश आहे. या अभिनेत्रीने नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात कार्यक्रमाला हजेरी लावली. तिच्या या नव्या लूकचीही खूप चर्चा झाली. तर या इव्हेंटमध्ये इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानही आला होता. पण त्याच्यामुळे उर्फीचं नुकसान झालं आहे.
या कार्यक्रमासाठी उर्फी जावेदने नेहमीप्रमाणेच हटके फॅशन केली होती. तिने लाल रंगाची साडी नेसली होती तर त्यावर एक बोल्ड ब्लाउज परिधान केला होता. याबरोबरच तिने यावेळी डोक्यावर एक मुकुट घातला होता. तिच्या या लूकने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं. बाबिल त्या कार्यक्रमात आल्यावर उर्फीने त्याचं जोरदार स्वागतही केलं. पण काही वेळातच एक फोटो पोस्ट करून “बाबिलला माझा हेवा वाटतो,” असं धक्कादायक विधान तिने केलं.
आणखी वाचा : “मी सेमी प्रेग्नंट…” वाढलेल्या पोटाचा फोटो शेअर करत उर्फी जावेदचं मोठं वक्तव्य
उर्फी जावेदने या कार्यक्रमातील तिचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. त्या फोटोमध्ये तिने घातलेला मुकुट तुटलेला दिसला. मुकुटाचा तुटलेला भाग हातात घेऊन ती फोटो काढत होती. हा मुकुट बाबिल खानमुळे तुटल्याचं तिने स्टोरी मध्ये म्हटलं. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “बाबिलने माझा मुकुट तोडला कारण त्याला माझा हेवा वाटतो.”
आता तिने शेअर केलेला हा फोटो खूप चर्चेत आला आहे. बाबिलने उर्फीचा मुकुट तोडल्यामुळे उर्फीचं मोठं नुकसान झाल्याचं तिचे चाहते म्हणून लागले आहेत.