अभिनेते इरफान खान यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक फर आवडीने बघतात. आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा मुलगा बाबिल खान सिनेसृष्टीत येण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘काला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. इरफान खानच्या कामामुळे प्रेक्षकांच्या बाबिलकडूनही खूप अपेक्षा आहेत. आता बाबिलने आपल्या वाडिलांबद्दल भाष्य केलं आहे.

बाबिलचा ‘काला’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी, चाहत्यांना बाबिलबद्दल अशी खात्री वाटते की, ज्याप्रमाणे त्याच्या वडिलांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली त्याचप्रमाणे तो देखील पडद्यावर आपली वेगळी छाप निर्माण करेल. आता याबद्दल बाबिल खानने एक विधान केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”

आणखी वाचा : आर्यन खानकडून करण जोहरला मिळाला मोठा झटका, धुडकावली चित्रपटाची ऑफर कारण…

बाबिल खानने त्याचे वडील इरफानच्या निधनानंतर काही महिन्यांनीच त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी बाबिलने तो खूप दडपणाखाली असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “दोन वर्षांपूर्वी आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा मला दडपण होतं. ते दडपण मला आनंदी करायचे आणि मला घाबरायचेही. पण आता त्या दडपणाची व्याख्या बदलली आहे. आता दडपणामुळे मला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.”

बाबिलला जेव्हा विचारण्यात आले की, त्याचे वडील इरफानचे कोणते गुण त्याला आत्मसात करायला आवडतील? यावर त्याने उत्तर दिले की, “माझ्या वडिलांकडे असलेले गुण ते त्यांच्याबरोबरच घेऊन गेले. आता मी स्वतःमधील गुणांचा शोध घेईन. बाबिलचं हे उत्तर ऐकून सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वळले.

हेही वाचा : ‘तू मुसलमान आहेस का ?’; युजरने विचारलेल्या प्रश्नावर बाबिल खानने दिलं ‘हे’ उत्तर…

‘काला’ हा अन्विता दत्त दिग्दर्शित सायकॉलॉजिकल ड्रामा चित्रपट आहे. ‘काला’मध्ये बाबिल खान आणि तृप्ती डिमरीबरोबरच स्वस्तिका मुखर्जी, अमित सियाल, अभिषेक बॅनर्जी हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी ‘नेटफ्लिक्सव’र प्रदर्शित होणार आहे. सध्या ‘काला’चा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत असून या ट्रेलरला खूप चांगलं प्रतिसाद मिळत आहे.