दिवंगत अभिनेते इऱफान खान यांची आज जयंती. इरफान यांच्या निधनामुळे कलाविश्वासह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना दुःखद धक्का बसला. इरफान यांच्या कुटुंबीयांनाही या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर येण्यास बराच काळ लागला. आज इरफान यांच्या जयंतीनिमित्त कुटुंबियांसह चाहतेमंडळीही त्यांच्या आठवणीत रमले आहेत. इरफान यांचा मुलगा बाबिलनेही अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे.

आणखी वाचा – आठवड्याभरानंतरही रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, आठ दिवसांमध्येच कोट्यवधींची कमाई

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

वडिलांच्या निधनानंतर बाबिलची कशी अवस्था झाली होती? हे त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. त्याने ‘Qala’ चित्रपटामधून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बाबिलने वडिलांच्या निधनानंतर नेमकी काय परिस्थिती होती याविषयी भाष्य केलं.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “आमच्याबरोबर असं घडलं तेव्हा मला याच्यावर विश्वासच बसत नव्हता. या घटनेला एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर माझ्यासमोर सत्य परिस्थिती समोर आली. मी खूप वाईट अवस्थेमध्ये होतो. जवळपास ४५ दिवस मी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलं होतं.”

आणखी वाचा – Video : “तरीही चिटकून डान्स करतेस आणि…” टीना-शालीनचा रोमान्स पाहून सलमान खान भडकला

“बाबा पुन्हा येणारच नाही ये हळूहळू मला कळत गेलं. मी माझ्या जवळच्या मित्राला गमावलं होतं. मी अजूनही एवढा कोलमडलो आहे की हे दुःख मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. खरं तर बाबांच्या आठवणींमध्ये मी स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याच आधारे आम्ही सगळे आयुष्यामध्ये पुढे जात आहोत.” आजही इरफान खान यांचं नाव समोर आलं की त्यांचे सगळेच चित्रपट व त्यांचा अभिनय डोळ्यासमोर उभा राहतो.

Story img Loader