Irrfan Khan Sutapa Sikdar Love Story: हुरहुन्नरी अभिनेता इरफान खानची आज तिसरी पुण्यतिथी आहे. २९ एप्रिल २०२० रोजी त्याचं निधन झालं. त्याच्या पुण्यतिथीनिमित्त चाहते त्याने साकारलेल्या भूमिका व त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इरफान खान व त्यांच्या पत्नी सुतापा सिकदर यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात. या दोघांच्या प्रेम कहाणीची सुरुवात दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकताना झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पैशांसाठी ‘द कपिल शर्मा शो’ सोडणारा कृष्णा अभिषेक एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो? जाणून घ्या

सुतापा आणि इरफान यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात दिल्लीच्या मंडी हाऊसमधील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मग ही मैत्री प्रेमात बदलली. रिपोर्टनुसार सुतापा आणि इरफान एका अॅक्टिंग सेशनमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यावेळी इरफान जयपूरमधून दिल्ली आले होते आणि त्यांनी पाहिलं की इथे मुलीही मैत्रिणी होऊ शकतात. एकत्र शिकत असताना इरफान आणि सुतापा यांना लक्षात आलं की त्यांच्यात बऱ्याच गोष्टी समान होत्या. कोणत्याही मुद्द्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन एकसारखा होता. त्यामुळे दोघांमधली मैत्री हळू-हळू प्रेमात बदलू लागली. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – कुमार सानूंच्या मुलीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणाली…

बराच काळ दोघंही लिव्ह इनमध्ये राहिले. दोघांनी आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं. पण अशातच सुतापा प्रेग्नंट राहिल्या. लग्न न करता सुतापा गर्भवती राहिल्याने त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत होती. शेवटी सगळ्या प्रश्नांना कंटाळून सुतापा आणि इरफान यांनी २३ फेब्रुवारी १९९५ रोजी कोर्ट मॅरेज केलं. एका मुलाखतीत इराफान खान यांनी सांगितलं होतं की सुतापाशी लग्न करण्यासाठी ते धर्म परिवर्तन करण्यासाठीही तयार होते. पण याची गरज पडली नाही. कारण सुतापा यांच्या कुटुंबियांनी इरफान यांना त्यांच्या धर्मासह स्वीकारलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrfan khan death anniversary his love story and inter religious marriage with sutapa sikdar hrc