इरफान खान हे सिनेसृष्टीतलं एक अजरामर नाव. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहेच; पण हाॅलीवूडमध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. अशा या दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिनेते इरफान खान यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘इरफान (१९६७ – २०२०) : अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ हा कार्यक्रम महालक्ष्मी येथील जी ५ ए (G5A) वेअरहाऊसमध्ये पार पडणार आहे. मकबूल, योगी, राणा, अशोक व साजन यांसारख्या विविध पात्रांतून इरफान खान अजरामर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास सांगणाऱ्या कार्यक्रमात म्हणजे २६ ते २८ या तीन दिवसांत इरफान खान यांचे सर्वांत अविस्मरणीय चित्रपट येथे प्रदर्शित होणार आहेत; ज्यात ‘द लंच बॉक्स’, ‘पान सिंह तोमर’ व मीरा नायर यांचा ‘द नेमसेक’ या सिनेमांचा समावेश आहे. तसेच प्रेक्षकांच्या आवडीचे ‘पिकू,’ ‘करीब करीब सिंगल’ व ‘तलवार’ हे सिनेमेही तिथे प्रदर्शित केले जाणार आहेत.

हेही वाचा… ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींचं शिक्षण आहे खूपच कमी, एकीने तर फक्त सहावीतच सोडलेली शाळा

लेखक-अभिनेत्री आणि इरफान खान यांच्या पत्नी सुतापा सिकदर म्हणाल्या, “तो जेव्हा आम्हाला सोडून गेला तेव्हा माझी एकच इच्छा होती की, त्याला प्रत्येक दिवशी साजरं केलं जावं.” त्या पुढे म्हणाल्या, “त्यानं केलेलं काम साजरं करण्यापेक्षा त्याला आठवणीत ठेवण्याचा दुसरा कोणता चांगला मार्ग क्वचितच असेल.”

हेही वाचा… ‘या’ फ्लॉप चित्रपटामुळे करोना काळात टीमचं घर चाललं; रोहित शेट्टीचा खुलासा, म्हणाला…

जी ५ ए (G5A) सिनेमा हाऊस व त्याचे सल्लागार परिषद सदस्य, तसेच चित्रपट निर्माते निखिल अडवाणी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

दिग्दर्शक म्हणून आपला दृष्टिकोन बदलण्याचे श्रेय इरफान यांना देत निखिल अडवाणी म्हणाले, “जर माझा ‘डी-डे’ (२०१३) हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा चित्रपट मानला जात असेल, तर त्यात इरफानचा मोठा वाटा आहे. तो प्रत्येक परफॉर्मन्स सहजरीत्या करायचा. मला खूप आनंद झाला आहे की, आम्ही त्याचे सर्वांत खास चित्रपट त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासासाठी तयार करू शकलो. मी कृतज्ञ आहे की, मी कॉल केलेला प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक व कोलॅबरेटर म्हणाला की, अशा उत्कृष्ट कलाकाराला आदरांजली वाहण्यात त्यांचाच सन्मान होईल.”

हेही वाचा… Bigg Boss 17 मध्ये अंकिता लोखंडेच्या पतीने प्रसिद्धी अन् पैसा दोन्ही कमावलं, विकी जैनला शोसाठी मिळालं ‘इतकं’ मानधन

चित्रपटांच्या प्रदर्शनासह, या वीकेंडला चित्रपट समीक्षक व स्तंभलेखक शुभ्रा गुप्ता यांचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’मधील ‘इरफान : अ लाइफ इन मूव्हीज’ याचे वाचन, तसेच इरफानबद्दल लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन होईल.

पास आणि पूर्ण वेळापत्रकासाठी insider.in/go/cinema-house ला भेट द्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrfan khan event in mahalaxmi mumbai to pay tribute to irrfan khans contribution to cinema dvr