अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला व प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला.त्यापूर्वी चित्रपटातील कलाकार मंडळीचा फर्स्ट लूक समोर आला. रणबीर कपूर, अनिल कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यापाठोपाठ अभिनेता बॉबी देओलचा फर्स्ट लूक समोर आला तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोस्टरमध्ये तर बॉबीचा रक्ताने माखलेला चेहेरा पाहून लोक हैराण झालेच, शिवाय टीझरमध्येसुद्धा शेवटी काही सेकंदासाठी दिसणाऱ्या बॉबीचा अवतार पाहून चित्रपटात नेमकं हे पात्र कसं असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या टीझरमध्ये बॉबीला पाहून काही लोकांनी तो एक होमोसेक्शुअल व्यक्तिरेखा साकारत असल्याचा अंदाज बांधला तर काही लोकांनी तो कॅनीबल म्हणजे नरभक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे तर्क लावले.

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे ‘कुछ कुछ होता है’च्या प्रदर्शनाच्या दिवशी करण जोहरला देशाबाहेर जावं लागलं होतं

नुकतंच ‘जागरण फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बॉबी देओलने हजेरी लावली. यावेळी त्याला त्याच्या पात्राविषयी विचारण्यात आलं. यावर बॉबी म्हणाला, “मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. टीझरच्या त्या सीनमध्ये मी नेमकं काय करतो हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे, पण त्याबद्दल मी आत्ता काहीच सांगणार नाही. त्या सीनमध्ये मी खाताना, काहीतरी चावताना दिसत आहे.”

बॉबीचं हे उत्तर ऐकून तो एका नरभक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो अशी शक्यता सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र वीएफएक्समुळे ‘अ‍ॅनिमल’चं प्रदर्शनं पुढे ढकलण्यात आलं. आता हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर व बॉबी देओल हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे.