बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. हृतिकची बहीण पश्मिना रोशन आणि कार्तिकला दिवाळी पार्टीत एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. ते दोघे लॉंग ड्राइव्हला गेल्याच्या चर्चाही होत्या. कार्तिक आणि पश्मिना यांच्या डेटिंगबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिकच्या जवळच्या व्यक्तीने याबाबत खुलासा केला आहे. “कार्तिक आणि पश्मिना यांच्या डेटिंगच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही. कार्तिक सध्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच कार्तिकचा ‘भूल भुलैय्या २’ प्रदर्शित झाला. आता त्याच्या फ्रेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘शहजादा’ आणि ‘सत्या प्रेम की कथा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र आहे. त्यामुळे त्याच्याकडे रिलेशनशिपसाठी अजिबात वेळ नाहीये”, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ वाद: रोहित पवारांची राज ठाकरेंवर टीका; म्हणाले, “शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांना मनसेनं…”

हेही पाहा >> Photos : ‘बिग बॉस’च्या घरात गौतम विगसह लिपलॉक केल्यामुळे चर्चेत आलेली सौंदर्या शर्मा नक्की आहे तरी कोण?

दिवाळी पार्टीत एकत्र दिसल्यानंतर कार्तिक आणि पश्मिना यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पश्मिना ही राजेश रोशन यांची मुलगी आहे. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, कार्तिक त्याच्या नवीन गाडीतून पश्मिनाला जुहू येथे लॉंग ड्राइव्हवर घेऊन गेला होता. मुंबईमध्ये कार्तिक आणि पश्मिनाच्या अनेक आवडत्या जागा असून तिथे ते भेटत असल्याचंदेखील सांगण्यात येत होतं. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा >> “तुझी उंची…”, ‘बिग बॉस’च्या घरात विकास सावंतने सांगितला ब्रेकअपचा किस्सा

भूल भुलैय्या २ नंतर कार्तिक फ्रेडी चित्रपटातून कार्तिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is kartik aaryan dating hrithik roshan cousin pashmina know the truth kak