बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. मागच्या काही काळापासून सारा अली खान क्रिकेटर शुबमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याआधी सारा कार्तिक आर्यनला डेट करत होती. या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चाही झाली होती मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. पण आता ही दोघंही पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने या दोघांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे काही फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमधील पहिल्या फोटोत कार्तिकचा संपूर्ण चेहरा दिसत नाहीये. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये कार्तिक आणि सारा एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे. एकीकडे कार्तिक आर्यन चेक्सच्या शर्टमध्ये दिसतोय तर सारा अली खान पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक पँटमध्ये कूल दिसत आहे. या दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघंही पुन्हा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
आणखी वाचा- “सैफ अली खानबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मी…” अमृता सिंगने सांगितलं दुसरं लग्न न करण्यामागचं खरं कारण
कार्तिक-साराच्या या फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने लिहिलं, “सार्तिकची जोडी जादुई आहे. जर दोघं एकत्र आले तर त्यांना कोणतीच जोडी हरवू शकत नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “असं वाटतंय की काहीच बदललं नाही. अगदी जुन्या दिवसांसारखंच वाटत आहे. दोघांचंही डोळ्यांनी बोलल्यासारखं.”
आणखी वाचा- “मी गप्प बसणार नाही…”, आदिल खानच्या आईने फोन केल्यानंतर राखी सावंतचं वक्तव्य
दरम्यान कार्तिक आर्यन आणि सारा अली खान २०२० मध्ये इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटात एकत्र दिसले होते. ही जोडी चाहत्यांनाही खूप आवडली होती आणि ते काही काळ डेट करत असल्याचं बोललं गेलं होतं. ‘कॉफी विथ करण’ सीझन ७ मध्ये करण जोहरने पुष्टी केली होती की दोघं खरोखर डेट करत होते आणि त्यांचं ब्रेकअप झालं आहे.